Maharashtra politics : 'पक्षात येण्यासाठी काही जणांची इच्छा', शरद पवारांनी टाकला बॉम्ब, दादांची साथ कोण सोडणार?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
पक्षात येण्यासाठी काही जण इच्छूक असल्याचं छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. आज अजित पवार गटाचे नेते बाबाजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या प्रवेशापूर्वी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. पक्षात येण्यासाठी काही जण इच्छूक असल्याचं शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
'पक्षात येण्याची काही जणांची इच्छा आहे, मात्र पक्षात घ्यायचं की नाही हे नेते बसवून ठरवतील. सरसकट प्रवेश नको अशी भूमिका असल्याचं' पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान यापूर्वी देखील शरद पवार यांनी अजित पवार यांना धक्के दिले आहेत. आज देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबाजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का असून? आणखी किती नेते अजित पवार यांची साथ सोडणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
advertisement
दरम्यान राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर मतभेद असण्याचं काही कारण नाही. दोन समाजात दरी निर्माण व्हायला नको. दोन -तीन जिल्ह्यांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जी चर्चा करायला हवी होती ती सरकारनं केली नाही. जरांगे, भुजबळ, हाके आणि आम्हाला चर्चेसाठी बोलवावं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
July 27, 2024 1:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Maharashtra politics : 'पक्षात येण्यासाठी काही जणांची इच्छा', शरद पवारांनी टाकला बॉम्ब, दादांची साथ कोण सोडणार?