...म्हणून आम्ही ठाकरेंना सोडलं : बच्चू कडू
बच्चू कडू म्हणाले, गुवाहाटीला जावून आम्ही बदनाम झालो. पन्नास खोके म्हणून आमच्याकडे पाहिले गेले, आम्हाला हिनवले गेले. खोकेवाला आला म्हणून आम्हाला संबोधल गेलं. मात्र, दिव्यांग मंत्रालयासाठीच उद्वव ठाकरेंना सोडून गुवाहाटीला गेलो असल्याचा निर्वाळा आमदार बच्चु कडू यांनी केला आहे. मी उद्वव साहेब ठाकरे यांच्याकडे दिव्यांग कल्याण खातं मागवलं होतं. मात्र, त्यांनी दिल नाही. शिंदे साहेबांनी दिलं असं सांगत त्यांनी गुवाहाटीला जाण्यामागेच रहस्य उलगडलं आहे. राज्याच्या एकून बजेटच्या पाच टक्के निधी हा दिव्यांगांवर खर्च होत नाही ही शोकांतीका असून वेळ पडल्यास त्यासाठी सरकार विरोधात आंदोलन देखील करण्याचा इशारा बच्चु कडू यांनी दिला आहे. नंदुरबार मधल्या शासन दिव्यांगाच्या दारी या उपक्रमाअंतर्गत त्यांनी दिव्यांग बांधवासोबत संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. आगामी काळात दिव्यांगासाठी शासनाच्या माध्यामतून काय करण्याचा माणस आहे, यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या हस्ते दिव्यांगाना विविध याजेच्या लाभाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
advertisement
वाचा - G20 परिषदेला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं ध्येय, वाचा पीएम मोदींचा संपूर्ण ब्लॉग
आमदार बच्चू कडू म्हणाले, मी गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रत्येक ठिकाणी हा विषय मांडला आहे. दिव्यांगांसाठी भांडलो आहे. आज सोन्याचे दिवस येत आहेत. आपलं दिव्यांग मंत्रालय हे देशातलं पहिलं मंत्रालय असणार आहे. सगळे आमदार गुवाहाटीला गेले त्या काळात मला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे फोन आले. मी त्यांना म्हटलं, मी तुमच्याबरोबर येतो. तुम्ही दिव्यांग मंत्रालय देत असाल तर मी तुमच्याबरोबर येईन. त्या काळात आम्ही बदनाम झालो. परंतु, त्याबदल्यात आपल्याला काय मिळालं? दिव्यांग मंत्रालय मिळणार आहे. सामान्य माणसाचं मंत्रालय पहिल्यांदा होतंय.