'भावी मुख्यमंत्री जितेंद्र आव्हाड साहेब...'
ठाण्यातील वर्दळीच्या मुलूंड चेकनाका परिसरात जितेंद्र आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त काही प्रमुख का''र्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर लावले आहेत. यामधील एका बॅनरवर 'भावी मुख्यमंत्री जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा' असा आशय आहे. आता खरंतर आव्हाडांचा वाढदिवस 5 ऑगस्टला आहे, त्याआधी ही बॅनरबाजी कऱण्यात आली, आणि त्यामुळे आता राजकीय चर्चांनी मात्र जोर धरला आहे.
advertisement
आता ठाण्यातील बहुतांश भागात आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त जरी बॅनर लागले असले, तरी हे बॅनर मात्र लक्षवेधी ठरलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ठाणे शहरातील पदाधिकारी सुहास दळवी आणि चेतन दळवी यांनी ही बॅनरबाजी केली असल्याचं समोर येत आहे.
advertisement
Maharashtra Politics: 'वाकड्यात जाल तर....' उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा!
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jul 31, 2024 7:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Politics: 'भावी मुख्यमंत्री जितेंद्र आव्हाड साहेब...', ठाण्यातील बॅनरबाजी चर्चेत
