Maharashtra Politics: 'वाकड्यात जाल तर....' उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा!

Last Updated:

मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यातून आज उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाकरेंच्या रडारवर होते...

News18
News18
मुंबई: मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे आक्रमक पवित्र्यात पाहायला मिळाले. ठाकरेंचं प्रमुख लक्ष्य राहिलं शिंदे-भाजप सरकार.  उद्धव ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर सडकून टीका केली.
विधानसभेची लढाई सुरू: “लढाईला तोंड फुटतं आहे. हर हर महादेव ही महत्त्वाची घोषणा आहे. लोकसभेत आणखी मोठ्या विजयाची अपेक्षा होती.  अखिलेश यादव, ममता बॅनर्जी भेटल्या. अनेकजण बोलले की तुम्ही देशाला दिशा दाखवली. आम्ही असेच आहोत. वाकड्यात गेलात तर तोडू”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. “भाजप म्हणजे चोर माणसं. राजकारणातील षंढ माणसे. असा नडलो की मोदींना घाम फोडला. मोदींचे भाषण बघताना आता कीव येते. 10 वर्षे काय अंडी उबवली?” असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी  केला.
advertisement
'मुंबई ओरबाडली, सावध व्हा' -ठाकरे
“ शिंदे-भाजप सरकारचे  मनसुबे राज्याला भिकारी बनवणारे आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “मुंबई ओरबाडताना मी गप्प बसू शकत नाही. आलात तर तोडून टाकू”, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला. “हे व्यापारी आपल्यात फूट पाडत आहेत. एवढे खाताय ते जातंय कुठे? खायला काही मर्यादा आहेत की नाही? धनाढ्य आणि चोऱ्यामाऱ्या करणारे दुबार मतनोंदणी करत आहेत. यावेळी झोपून राहिलो तर मुंबई उपऱ्यांच्या हातात जाईल. मराठीला प्रवेश नाही म्हणतात. पहिले कानफाट फोडा. गेट आऊट सांगून गुजरातला जायला सांगा. बुटचाटे लाचार खुर्चीसाठी आईवर वार करत आहेत”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
advertisement
'विधानसभेला मोदींची राहिलेली गुर्मी काढू'
यावेळी उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींना देखील लक्ष्य केलं,“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचारासाठी आलेच पाहिजे. राहिलेली गुर्मीही काढू”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. असं म्हणत ठाकरेंनी एकप्रकारे विधानसभेचं रणशिंगच फुंकलं आहे.
advertisement
मुंबई महापालिका लुटली, ठाकरेंची टीका
“बीएमसीत 90 हजार कोटींच्या ठेवी होत्या. आता किती राहिल्या आहेत ते सांगत नाहीत. एमएमआरडीएला बीएमसीतून पैसा का? बीएमसीला भिखेला लावत आहेत. आमची सत्ता आल्यावर एमएमआरडीएला मुंबईतून हद्दपार करू. इथे महापालिका आहे. सगळे गुजरातला… आपणही जावून राहू मग गुजरातला”, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. या लोकांना आपल्याला आता गाडायचं आहे, असा निर्धार करा असं ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये यावेळी चैतन्य पाहायला मिळालं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Politics: 'वाकड्यात जाल तर....' उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा!
Next Article
advertisement
ED Raids In Baramati : एकाचवेळी 5 ठिकाणी धाड, ईडीच्या कारवाईने बारामतीत खळबळ, कोट्यवधींचा घोटाळा प्रकरणी कारवाई
एकाचवेळी 5 ठिकाणी धाड, ईडीच्या कारवाईने बारामतीत खळबळ, कोट्यवधींचा घोटाळा प्रकरण
  • एकाचवेळी 5 ठिकाणी धाड, ईडीच्या कारवाईने बारामतीत खळबळ, कोट्यवधींचा घोटाळा प्रकरण

  • एकाचवेळी 5 ठिकाणी धाड, ईडीच्या कारवाईने बारामतीत खळबळ, कोट्यवधींचा घोटाळा प्रकरण

  • एकाचवेळी 5 ठिकाणी धाड, ईडीच्या कारवाईने बारामतीत खळबळ, कोट्यवधींचा घोटाळा प्रकरण

View All
advertisement