Shocking : शाळेतील खोडसाळपणा नडला; 13 वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात...; मुंबईतील भयंकर घटना
Last Updated:
Mumbai Shocking News : जर तुमच्याही घरातील मुलं शाळेत जात आहे तर ही बातमी नक्की वाचा. मुंबईतील एका शाळेत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.
मुंबई : शाळेतील दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यात खास असतात. विद्यार्थी असताना वर्गात मस्ती-खोड्या करणे हे सामान्यच आहे. मात्र मुंबईतील एका विद्यार्थ्यासोबत असा धक्कादायक प्रकार घडला की ज्याने सर्वांनाच हादरवून सोडले.
नेमके घडले काय?
जिथे शाळेतील एका छोट्या खोडसाळपणामुळे अवघ्या 13 वर्षांच्या विद्यार्थ्याच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती. वर्गात मित्रांसोबत खेळताना या मुलाने शिक्षकांपासून लपण्यासाठी टाचणी तोंडात ठेवली. मात्र ही टाचणी चुकून गिळली गेली आणि थेट श्वासनलिकेत जाऊन अडकली.
मिळालेल्या माहितीनुसार हा मुलगा वर्गात मित्रांना टाचणी टोचून मस्करी करत होता. दरम्यान त्याचवेळी शिक्षक वर्गात आले. मात्र पकडले जाऊ नये या भीतीने मुलाने घाईघाईत टाचणी तोंडात लपवली. पण काही क्षणातच ती टाचणी गिळली गेली आणि फुफ्फुसाजवळील श्वासनलिकेत अडकली गेली.
advertisement
टाचणी गिळल्यानंतर मुलाला सतत खोकला
टाचणी गिळल्यानंतर मुलाला सतत खोकला येऊ लागला. त्याची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून त्याला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मुलाचा एक्स-रे काढला असता त्याच्या फुफ्फुसाजवळ टाचणी अडकलेली असल्याचे स्पष्ट झाले.
वेळेत उपचार मिळाल्याने मुलाची प्रकृती स्थिर
यानंतर कूपर रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर टीमने रिजिड ब्रॉन्कोस्कोपी या तंत्राचा वापर करून शस्त्रक्रिया केली. तोंडावाटे विशेष उपकरण आत टाकून फुफ्फुसांचे वायुवीजन सुरळीत ठेवत अवघ्या 30 मिनिटांत टाचणी बाहेर काढण्यात आली.
advertisement
वेळेत उपचार मिळाल्यामुळे मुलाच्या फुफ्फुसाला कोणतेही नुकसान झालेले नाही. सध्या मुलाची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 8:22 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking : शाळेतील खोडसाळपणा नडला; 13 वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात...; मुंबईतील भयंकर घटना








