Pune Mumbai Missing Link: पुणे-मुंबई प्रवास सुसाट, मिसिंग लिंकबाबत मोठं अपडेट, कधी खुली होणार?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Pune Mumbai Missing Link: पहिल्या टप्प्यात मिसिंग लिंकवर हलक्या वाहनांनाच प्रवेश देण्याचे नियोजन सुरू आहे.
पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत महत्त्वाचं अपडेट आहे. येत्या मे महिन्यापर्यंत हा प्रकल्प खुला करण्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील प्रवास सोपा आणि जलद होणार आहे. आतापर्यंत या मिसिंग लिंकचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प महत्त्वाचा ठरणारा आहे. पहिल्या टप्प्यात खबरदारीचा उपाय म्हणून मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीला परवानगी नाकारण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव एमएसआरडीसीकडून विचाराधीन आहे. वाहतुकीबाबतचे नियम विचारात घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाईल.
advertisement
कसे असेल नियोजन?
पहिल्या टप्प्यात मिसिंग लिंकवर हलक्या वाहनांनाच प्रवेश देण्याचे नियोजन सुरू आहे. वाहतूक नियमानुसार आणि प्रवाशांची सुरक्षितता विचारात घेऊन ही कार्यवाही केली जाईल.
सुरक्षेच्या उपाययोजना
दरम्यान, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनत आहे. त्यातच या महामार्गावर ज्वलनशील पदार्थ किंवा कोणत्याही पदार्थांचे टँकर बंद पडले अथवा अपघात झाल्यास कित्येक तास वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. महिनाभरापूर्वी प्रोपिलीनचा टँकर उलटल्याने अशीच गंभीर स्थिती निर्माण झाली होती. 30-32 तासांच्या वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल झाले होते. ही बाब विचारात घेता महामंडळाकडून काही उपाययोजना करण्यात येणार आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 8:25 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Mumbai Missing Link: पुणे-मुंबई प्रवास सुसाट, मिसिंग लिंकबाबत मोठं अपडेट, कधी खुली होणार?










