टोळक्याकडुन लाथा बुक्क्याने मारहाण
बीडच्या केज तालुक्यातील सोनीजवळ येथे म्हसोबा यात्रेच्या निमित्त तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री 11 वाजता हा कार्यक्रम सुरू असताना सुधीर प्रकाश वैरागे नामक तरूणाला एका टोळक्याकडुन लाकडी काठ्या आणि लाथा बुक्क्याने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये तरूण गंभीररित्या जखमी झाला असुन अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
अद्याप गुन्हा दाखल नाही
बीडमध्ये एवढा मोठा राडा झाला. व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाले असताना देखील पोलीसात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती समोर आली नाही. अचानक सुधीर प्रकाश वैरागे नावाच्या तरूणाला एका टोळक्याकडून लाकडी काठ्या आणि लाथा बुक्क्याने बेदम मारहाण करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू
दरम्यान, या घटनेमध्ये तरूण गंभीररित्या जखमी झाला असून अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या तरुणाच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली. तर गुन्हा दाखल करू नये म्हणून या प्रकरणात नेमकं कोण पोलिसांवर दबाव टाकत आहेत? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
