बीडच्या आंबेजोगाई शहरातील टिळक नगर भागात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. जमीन आणि संपत्तीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. समोरील व्यक्तीला धमकावण्याच्या हेतून हवेत गोळीबार केल्याचं समजत आहे. पण गोळीबाराची ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोळीबाराचं अधिकृत कारण कारण अद्याप समोर आलं नाही. पण सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, त्यानंतर दोन सख्ख्या भावांचा खून आणि आता गोळीबाराची घटना, या सगळ्या घटनांमुळे बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
advertisement
आष्टीत दोन सख्ख्या भावांची हत्या
आदिवासी पारधी समाजातील तीन सख्खा भावांवर त्याच समाजातील जमावाने लोंखडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहीरा गावात घडली. अजय विलास भोसले, भरत विलास भोसले असं मृत पावलेल्या भावंडाची नावं आहेत. तर कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला आहे. किरकोळ वादातून हा गंभीर प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे काल रात्री आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते. गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते. रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला चढवला.
या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला. असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनतेली सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून का आणि कोणत्या कारणावरुन केला? हे अद्याप समजले नाही. दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत.