TRENDING:

100 आमदार अन् पंकजा मुंडे पहिल्या मुख्यमंत्री, बीडमध्ये ओबीसी नेत्याचं मोठं विधान

Last Updated:

ओबीसी एक झाल्यास आपला मुख्यमंत्री होईल असे विधान ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील चाटगाव येथे ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरेश जाधव, प्रतिनिधी
पंकजा मुंडे
पंकजा मुंडे
advertisement

बीड : ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पंकजा मुंडे यांना पहिल्या महिला मुख्यमंत्री करायचं असल्याची गर्जना केलीय.  चाटगाव इथं ओबीसींच्या मेळाव्यात बोलताना नवनाथ वाघमारे यांनी मतदारांना हे आवाहन केलं. ओबीसींचे १०० आमदार विधीमंडळात पाठवायचे आहेत, त्यासाठी कामाला लागं असं नवनाथ वाघमारे म्हणाले. वाघमारेंच्या या विधानामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्रीपदाची चर्चा रंगली आहे.

advertisement

पंकजा मुंडे यांना ओबीसीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करायचं आहे. त्यासाठी 2024 च्या विधानसभेत 100 आमदार ओबीसीचे पाठवा. ओबीसी एक झाल्यास आपला मुख्यमंत्री होईल असे विधान ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील चाटगाव येथे ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते. महायुतीत मुख्यमंत्री पदावरून केंद्रात चर्चा सुरू असताना आता ओबीसींकडून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्यात यावं अशी मागणी होत आहे. यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचे नांव चर्चिले जात आहे.

advertisement

नवनाथ वाघमारे म्हणाले की, 2024 च्या विधान सभेच्या निवडणूकीत 100 ओबीसीचे आमदार निवडून आले तर पंकजा ताई राज्याचं नेत्रुत्व करण्यास सक्षम आहेत. महाराष्ट्र राज्याच्या ओबीसींच्या पाहिल्या महीला मुख्यमंत्री माझी बहीण पंकजाताई झाली पाहिजे. 70 वर्षाचे योद्धा छगन भुजबळ झाले पाहिजे. धनु भाऊ राज्यांचे मुख्यमंत्री झाले पाहिजे असंही नवनाथ वाघमारेंनी म्हटलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
100 आमदार अन् पंकजा मुंडे पहिल्या मुख्यमंत्री, बीडमध्ये ओबीसी नेत्याचं मोठं विधान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल