TRENDING:

Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आंदोलन पेटले, शहरात संचारबंदी; इंटरनेट सेवाही बंद

Last Updated:

बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी नेत्यांच्या घरावर दगडफेक केली, घर, कार्यालय पेटवून देण्यात आलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लक्ष्मण घाटोळ, बीड, 31 ऑक्टोबर : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही यावर ते ठाम आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात बैठका घेत आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी नेत्यांच्या घरावर दगडफेक केली, घर, कार्यालय पेटवून देण्यात आलं. तर बस स्थानकातील ६० बसेसची तोडफोड करण्यात आली. यानंतर बीड शहरात संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव इंटरनेटही बंद करण्यात आलं असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण, बस स्थानकातल्या 60 बसची तोडफोड
बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण, बस स्थानकातल्या 60 बसची तोडफोड
advertisement

बीड शहरामध्ये आज संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चौका चौकामध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. काल झालेल्या हिंसाचारानंतर आज बीडमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. तर इंटरनेट सुविधा बंद करण्यात आलीय. जिल्ह्यात प्रत्येक तालुका मुख्यालयापासून पाच किमी परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलीय.

Maratha Reservation : कुठे तोडफोड तर कुठे जाळपोळ, मराठा आंदोलकांच्या टार्गेटवर राजकीय नेते, घटनास्थळावरचे PHOTOS

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
सर्व पहा

जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीच्या आदेशाचं पत्र काढलं आहे. सर्वसामान्यांना त्रास झाला तर पोलीस आता गुन्हे दाखल करून आंदोलकांवर कडक कारवाई करतील, असा इशारा बीडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिला आहे. पोलिसांना बळाचा वापर करावा लागल्याची कबुलीही पोलीस अधिक्षकांनी दिली. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. रबर फायर आणि लाठीचार्ज केल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आंदोलन पेटले, शहरात संचारबंदी; इंटरनेट सेवाही बंद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल