मुलगी आणि पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याचाच तीन वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी रडत होता त्यालाही मारहाण केली. चिमुकला आपण खून केल्याचं सांगू शकत नाही असा त्याला विश्वास पटला त्यामुळे त्याने मुलाला जीवंत सोडले. पत्नी आणि मुलीचा खून झाल्याचा बनाव करत आरोपी अजित अणप्पा वासुदेव हा मुरूम पोलीस ठाण्यात पत्नी व मुलीचा खून झाला याची तक्रार देण्यासाठी गेला होता. मात्र पोलिसांना त्याचा संशय आल्याने उलट तपासणी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार, मुरूम पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप दहिफळे यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह मुरूम येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या दुहेरी हत्याकांडातील मृतांची नावे लिंबाबाई अजित वासुदेव आणि त्यांची 8 वर्षीय मुलगी मानसी अशी आहेत. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून आरोपीने अगोदर पत्नीवर वार केले. मात्र पत्नीचा मी खून केल्याचं मुलगी पोलिसांना सांगेल या भीतीने त्याने आठ वर्षाच्या मुलीला देखील कुऱ्हाडीने मारले.
बेरडवाडी परिसरात मोठी खळबळ
तीन वर्षाचा मुलगा घटनास्थळी असताना त्यांना त्या मुलाला चापटा मारल्या मात्र मुलगा रडत होता तो मुलगा जास्त जोरात रडू लागल्याने आरोपीने तो सांगणार नाही असा भ्रम ठेवत पोलीस स्टेशन गाठले. मात्र पोलिसांनी त्याची उलट तपासणी केली असता त्यांना हा खून केल्याचं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी तीन वर्षाच्या मुलालाही विचारणा केली असता त्यांनाही वडिलांकडेच खुणावल्याने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर बेरडवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
