TRENDING:

गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप, महाड नगरपालिकेत काय होणार? शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी झुंजणार!

Last Updated:

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची तयारी केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मोहन जाधव, प्रतिनिधी, रायगड : रायगड जिल्ह्यातील सर्वात हाय व्होल्टेज निवडणुकीचा सामना रंगणारी महाड नगरपालिका यंदा चर्चेचा विषय बनलीय. या नगरपालिकेत एकूण दहा प्रभागासाठी २० नगरसेवक तर एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून मुख्य लढत शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित दादांची राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. कोकणातला तटकरे विरुद्ध गोगावले हा राजकीय संघर्ष उभा महाराष्ट्र जाणतो. नगर परिषद निवडणुकीत हा संघर्ष अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.
स्नेहल जगताप- भरत गोगावले
स्नेहल जगताप- भरत गोगावले
advertisement

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे तर दुसरीकडे ठाकरे सेना आणि भाजपदेखील या प्रभागांमध्ये ताकदवान असल्याने हे पक्ष कोणाला साथ देतात हे पाहणे महत्वपूर्ण राहणार आहे. यंदाच्या निवडणुकीत महाड नगरपालिकेत मंत्री भरत गोगावले आणि स्नेहल जगताप यांच्या गटाचा करिष्मा असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

advertisement

खरी लढत तटकरे विरुद्ध गोगावले यांच्यातच!

महाड नगरपालिकेची एकंदरीत राजकीय वाटचाल पाहता नगरपालिकेची 2016 मध्ये मुख्य लढत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी बघायला मिळाली होती. या लढतीत माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला सत्ता मिळाली होती आणि जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप नगराध्यक्षा झाल्या होत्या. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचा या निवडणुकीत निसटता पराभव झाला होता. मंत्री भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांचे सातत्याने सुरू असलेले वाद यामुळे हे दोन्ही नेते या नगरपालिकेवर विशेष लक्ष ठेवून आहेत.

advertisement

स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी प्रवेश, गोगावले यांच्यासाठी डोकेदुखी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील खरटमल कुटुंबाचा अनोखा छंद, जुन्या ग्रामोफोनचा केला संग्रह,काय आहे खास?
सर्व पहा

महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या स्नेहल जगताप यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भरत गोगावले यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षबांधणी करण्याचे ठरवल्याने गोगावले यांच्यासह शिंदेसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात गोगावले-जगताप समोरासमोर येणार आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप, महाड नगरपालिकेत काय होणार? शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी झुंजणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल