advertisement

Success Story : शेतकऱ्याची कमाल, 3 एकरमध्ये घेतलं तब्बल 45 क्विंटल तुरीचे उत्पादन, सांगितला यशाचा फॉर्म्युला

Last Updated:

योग्य नियोजन आणि प्रामाणिक कष्ट याच्या जोरावर शेतीतून मोती पिकवता येतात हे जालन्यातील एका शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

+
News18

News18

जालना : योग्य नियोजन आणि प्रामाणिक कष्ट याच्या जोरावर शेतीतून मोती पिकवता येतात हे जालन्यातील एका शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. तीन एकर क्षेत्रावर तब्बल 45 क्विंटल तुरीचे उत्पादन या शेतकऱ्याने मिळवले. पांडुरंग ढेबरे असं या शेतकऱ्यांचे नाव असून ते जालन्यातील निपाणी पिंपळगावचे रहिवाशी आहेत. पाहुयात कसं केलं या शेतकऱ्याने तूर पिकाचे नियोजन
योग्य वाणाची केली निवड
कोणत्याही पिकाची लागवड करताना वाणाची निवड महत्त्वाची ठरते. ढेबरे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गोदावरी या सुधारित वाणाची लागवड केली. लागवड ही पारंपरिक पद्धतीने न करता चार बाय आठ अंतरावर टोकन पद्धतीने केली.
advertisement
अनेक शेतकरी जास्त अंतरावर लागवड केल्यास आंतरपीक घेतात. परंतु, ढेबरे यांनी आंतरपीक न घेता, पिकाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल आणि हवा खेळती राहील याची काळजी घेतली. त्यामुळे पिकाची वाढ चांगली झाली. भरपूर प्रमाणात फुटवे आले.
ठिबकद्वारे सिंचनाची सोय केली. या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्य असलेल्या विद्राव्य खते दिली. तसेच योग्य वेळी कीड नियंत्रणासाठी दोन कीटकनाशकाच्या फवारण्या केल्या. जोमदार आलेल्या तुरीची मळणी करण्यात आली तेव्हा 63 कट्टे भरली. याचे वजन केले असता ते 45 क्विंटल 85 किलो इतके झाले. कोणत्याही पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी काटेकोर नियोजन फार महत्त्वाचे असल्याचे पांडुरंग ढेबरे यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शेतकऱ्याची कमाल, 3 एकरमध्ये घेतलं तब्बल 45 क्विंटल तुरीचे उत्पादन, सांगितला यशाचा फॉर्म्युला
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement