सभेपूर्वी निलेश राणे यांची रॅली काढण्यात आली होती, या रॅलीदरम्यान भास्कर जाधव समर्थक आणि राणे समर्थक आमने-सामने आले. वाद वाढला, दगडफेक देखील करण्यात आली. या प्रकरणात आता पोलिसांनी दोन्ही कडच्या तीनशे ते चारशे समर्थकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर आता भास्कर जाधव यांनी आपली भूमिका मांडली आहे.
नेमंक काय म्हणाले जाधव?
advertisement
निलेश राणे यांच्यावरती जर हल्ला करायचा होता तर मी ते माझ्या कार्यालयासमोरून जात असतानाच केला असता. त्यांनी पलीकडच्या रस्त्यावरून इकडे येण्याची गरजच काय होती?सभा गुहागरला होती तर मग निलेश राणे यांनी चिपळूणला माझ्या कार्यालयासमोर येण्याची गरज काय होती.
माझ्या कार्यालयापासून पन्नास मीटर अंतरावर निलेश राणे हे दीड तासाहून अधिक काळ होते. पोलिसांनी त्यांना न रोखता माझ्या कार्यालयासमोर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. निलेश राणे यांना वाटतं की राडा केला की सर्वजण घाबरतील, पण खरंच सगळे घाबरतील का? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.
तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
दरम्यान चिपळूणमधील दगडफेक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपच्या तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला. चिपळूनमधील घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून, दगडफेकीचे व्हिडीओ तपासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
