ही बैठक मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात घेतली जात आहे. बैठकीला मुंबईतील सर्व भाजप आमदार, खासदार तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप गेल्या काही महिन्यांपासून रणनीती आखत आहे. शिवसेना (शिंदे गट)सोबत युती करून भाजप मुंबईत सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहे. आजच्या बैठकीत प्रत्येक विभागातील राजकीय समीकरणांचा आढावा, मतदारसंघनिहाय ताकद, बूथ स्तरावरील व्यवस्थापन आणि प्रचारासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
advertisement
यंदाच्या निवडणुकीत भाजपचा फोकस “डबल इंजिन सरकार”च्या कामगिरीवर आणि मुंबईच्या विकासासाठी असलेल्या व्हिजनवर असणार आहे. त्यामुळे आजची बैठक आगामी राजकीय रणनितीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
खरं तर, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत आहे. पण गेल्या काही वर्षात मुंबईत भाजपची ताकद वाढली आहे. तसेच शिवसेनेत फूटही पडली आहे. यामुळे भाजप आता मुंबई महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे शिंदे गटाला सोबत घेऊन ठाकरे गटाला बॅकफुटवर ढकलण्यासाठी भाजपकडे जोरदार रणनीती आखली जात आहे.