अकोला महापालिकेमध्ये महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अकोला पालिकेत एकूण ८० जागांसाठी निवडणूक पार पडली. बहुमतासाठी ४१ जागा जागांची गरज आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने ४२ जागा असल्याचा दावा केला होता. पण आता भाजपने राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोबत घेतलं आहे. भाजपचे ३८ नगरसेवक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ३, अजित पवार गट १, शिंदे गट १ आणि अपक्षाला सोबत घेऊन ४४ जागांचा आकडा गाठला असल्याचा दावा भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे. 44 नगरसेवकांचे पत्र देण्यात आल्याचंही सावरकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
अकोल्यात भाजपची सत्ता येणार?
राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याची बातमी खरी ठरली तर सत्तेचं नवीन समीकरण तयार होणार आहे. तर दुसरीकडे काग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपल्याकडे 42 नगरसेवक असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पण आता, दोन्ही गटाने दावे केल्यामुळे कुणाची सत्ता स्थापन होणार,यामुळे अकोल्यातील राजकारण तापलं आहे.
अकोला महापालिका निवडणुकीत पक्षीय बलाबल एकूण ८० जागा
भाजप- ३८
काँग्रेस - २१
ठाकरे गट - ०६
वंचित बहुजन आघाडी - ०५
एमआयएम - ०३
शरद पवार गट -०३
शिवसेना शिंदे गट- ०१
राष्ट्रवादी अजित पवार गट - ०१
इतर / अपक्ष०२
