निवृत्त शिक्षिका असणाऱ्या अलका केरकर यांचा या प्रभागात दांडगा जनसंपर्क होता. साधी राहणी, पक्षाला समर्पित आयुष्य आणि भ्रष्टाचार विरोधी, अनधिकृतेला कधीच थारा न देणाऱ्या अलका केरकर निष्कलंक आयुष्य जगल्या.
नगरसेवक व राजकीय कार्यकर्त्यांना आदर्शवत ठरावे असे त्यांचे आयुष्य होते. सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणाऱ्या अलकाताईंच्या जाण्याने आमच्या वांद्रे पश्चिम विभागाचे कधीच न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. गेली तीस वर्षे वांद्रे पश्चिम मधील जनतेची सेवा आणि भाजपाचे काम मोठ्या संघर्षाने आम्ही केले. त्या संघर्ष काळातील एक महत्त्वाचा शिलेदारच मी आज गमावला आहे. त्याच्या जाण्याने वांद्रे पश्चिम हे आमचे एक मोठे कुटुंबच आज दु:खात बुडाले आहे, अशा भावना मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केल्या.
advertisement
२०१४-२०१५ दरम्यान मुंबईच्या उपमहापौरपदाची जबाबदारी सांभाळली
त्यांनी २०१४-२०१५ दरम्यान मुंबईच्या उपमहापौरपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच, २०२६ च्या सुरुवातीला झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर त्या महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या आघाडीच्या उमेदवारांपैकी एक होत्या. त्यांनी २०२६ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वांद्रे पश्चिम (वॉर्ड ९८) मधून महायुतीच्या (भाजप-शिवसेना-रिपाई) उमेदवार म्हणून विजय मिळवला आहे.
त्या जमिनीशी जोडलेल्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नागरी सुधारणा, आरोग्य आणि स्वच्छता या विषयांवर सक्रियपणे काम केले आहे. त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) जवळचे संबंध होते तसेच पक्ष संघटनेतही त्या सक्रिय होत्या.
