नेमंक काय म्हणाले राणे?
'जरांगे म्हणाले राणे मराठवाड्यात येत असतील तर येऊ दे, आमच्याकडे काय पाहणार? आम्ही कपडे घालतो. तु कपडे घातलेस तरी तसाच दिसतो आणि कपडे काढलेस तरी तसाच दिसतो. तुझ्यात आहे काय बघण्यासारख?' असा हल्लाबोल नारायण राणे यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, इतक्या वर्षात बरेच जणांनी दाढी वाढवली पण ते छत्रपती झाले का, नाही होत छत्रपती. जात पात धर्म बाजूला ठेवा आणि विकासाच्या मुद्यावर एकत्र या अस आवाहनही यावेळी नारायण राणे यांनी केलं आहे. दरम्यान आता नारायण राणे यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
August 09, 2024 2:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'कपडे घातले तरी पण अन् नाही घातले तरी पण...'; राणेंचा जरांगे पाटलांवर पुन्हा हल्लाबोल
