भाईंदर (उत्तन–पाली) परिसरातील कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी मत्स्य मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी झालेल्या सभेत नितेश राणे यांनी जोरदार भाषण केलं. पण, मिरा भाईंदरच्या पहिल्याच सभेत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.
'मीरा भाईंदरच्या आजूबाजूच्या परिसरात बघा किती हिरवे साप वळवळ करत आहेत. हिरव्या सापांना इथं दूध पाजू नका, ते तुमचे कधीच होणार नाही. ते तुम्हाला त्यांच्या खिशातले काढून देणार नाहीत. तुम्ही त्यांच्यासाठी काफीर आहात. ही लोक इकडे मोठ्या मोठ्या प्रमाणात मच्छी मारून घेऊन जातात. त्यामुळे ड्रोन चालू केले आहेत. तुम्हाला जर आमच्या हिंदूराष्ट्राच्या विरोधात कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर तो काही दोन पायाने शुक्रवारी जाणार नाही, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं.
advertisement
'प्रश्न आम्ही सोडवतो, मग मतदान त्यांना होता कामा नये'
तसंच, 'तुम्ही मला एकदा मला पाच वर्ष द्या, मी संपूर्ण भाग विकास करून देईन. 2026 ला आम्ही मुख्यमंत्री मत्स्य विकास योजना सुरू करणार आहोत. त्याच बरोबर आम्ही 2026 ला आम्ही 26 योजना चालू करणार आहोत. त्यामुळे तुमचे सगळे प्रश्न आम्ही सोडवतो. मात्र मतदान त्यांना करता असं होता कामा नये, आम्ही पाहिल्यादा 100 दिवसात आम्ही मच्छीमारीला शेतीचा दर्जा दिला. जे शेतकऱ्यांना भरपाई मिळते त्याच प्रकारची भरपाई तुम्हाला देखील मिळणार आहे, असं आश्वासनही नितेश राणे यांनी दिलं.
'नवीन योजना लवकरच राबवणार' नितेश राणेंचं आश्वासन
दरम्यान, भाईंदर (उत्तन–पाली) परिसरातील कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी मत्स्य मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. उत्तन वाहतूक सहकारी संस्था (आइस फॅक्टरी) येथे आयोजित या बैठकीत आमदार नरेंद्र मेहता, मत्स्य खात्याचे अधिकारी आणि कोळी बांधव उपस्थित होते. यावेळी, कोळी समाजाने जेटीची मागणी केली. अपघातावेळी तातडीच्या मदतीसाठी हेल्पलाईन, मच्छी मार्केट आणि कोळीवाड्यांतील घरांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं. मंत्री राणे यांनी ३६ नवीन योजना लवकरच राबविण्याचे आश्वासन देत जेटी, मच्छी मार्केट, कोळीवाडा आणि इतर सुविधांसाठी प्रयत्न केले जातील, असं सांगितलं. आचारसंहिता संपल्यानंतर मच्छी मार्केटचे भूमिपूजन करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.
