अमन नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. अमन हा वैशाली सूर्यवंशी यांना मागील चार महिन्यापासून सतत फोन आणि व्हॉट्सअॅपवर मेसेज करून धमक्या देत होता. त्याने सोशल मीडियावर बदनामीसह ड्रग्ज प्रकरणात गोवण्याची धमकी दिली होती. विधानसभा निवडणुकीत पैसे वाटल्याची बनावट संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर टाकण्याची, तसेच निवडणूक आयोग, CBI, ED आणि इन्कम टॅक्सकडे तक्रार करण्याचीही धमकी आरोपीनं दिली होती.
advertisement
एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या महिला नेत्यालाच अशाप्रकारे ब्लॅकमेल केल्याची घटना समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली सूर्यवंशी यांना अमन नावाच्या व्यक्तीने विविध मोबाईल क्रमांकावरून मागील चार महिन्यापासून सतत फोन आणि व्हॉट्सअॅप मेसेज करून धमक्या दिल्या.
एवढेच नव्हे तर, गाडीमध्ये ड्रग्ज ठेऊन अडचणीत आणण्याची धमकी देखील देण्यात आली. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. दरम्यान, वैशाली सूर्यवंशी यांनी पाचोरा भडगाव मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी आता नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे.