जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानं जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कलम 504 अन्वये शांततेचा भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान केल्या प्रकरणी आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
jitendra awhad: जितेंद्र आव्हाडांना मनुस्मृती आंदोलन भोवलं, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल
advertisement
धुळ्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी कुत्र्याच्या गळ्यात जितेंद्र आव्हाड यांचा फोटो घालून जोरदार घोषणाबाजी केली. तसंच संतप्त कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून दहन कऱण्यात आलं. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडल्याच्या निषेधार्थ भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे.
सोलापुरात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाले आहे. सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महायुतीचे पदाधिकारी एकत्र येऊन जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मीरा भाईंदर शहरात भाजप मार्फत आव्हाड यांच्या विरोधात गोल्डन नेस्ट येथे आंदोलन करण्यात आले .आव्हाड यांच्या फोटो ला भाजपच्या महिलांनी चपला मारत जोडे मार आंदोलन केले आहे.
