राज्यात 29 महापालिका निवडणुकींचा निकाल समोर आला. त्यात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व पाहायला मिळाले. या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच बिनविरोध पॅटर्न चर्चेत आला. यात मतदानापूर्वीच महायुतीचे 69 उमेदवार बिनविरोध निवडून आले. यावरून विरोधकांनी बरीच टीका केली. मात्र आता पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत हाच पॅटर्न दिसून येत आहे. सिंधुदुर्गात पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या तीन उमेदवार निवडून आले आहेत.
advertisement
बिनविरोध मुद्यावरून वातावरण तापण्याची शक्यता
सिधुंदुर्गमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपनं उघडलं खातं उघडलं आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या जिल्ह्यात भाजपचा पहिला उमेदवार बिनविरोध झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये प्रचाराचा उत्साह वाढला आहे. नगरपरिषदा महापालिका निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषदेतही बिनविरोध निवडून येण्याचा ट्रेंड कायम राहणार आहे. यावरून विरोधकांनी यापूर्वीच जोरदार आवाज उठवला होता त्यामुळं आता जिल्हा परिषदांमध्येही बिनविरोध मुद्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे.
वैभववाडीच्या साधना कोकिसरे बिनविरोध
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकिसरे जिल्हा परिषद गटातून साधना सुधीर नकाशे बिनविरोध निवडून आल्या. वैभववाडीच्या पंचायत समिती निवडणुकीत कोणताही विरोधी उमेदवार न आल्यानं साधना कोकिसरे बिनविरोध निवडून आले आहेत.
बिडवाडीत संजना संतोष राणे बिनविरोध
सिंधुदुर्ग जिल्हापरिषद निवडणूकीत शिवसेना उबाठा गटाला धक्का बसला आहे. बिडवाडी पंचायत समितीच्या उबाठा उमेदवार विद्या विजय शिंदे यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अवैध ठरला आहे. तीन अपत्याच्या कारणाने विद्या शिंदे यांचा अर्ज बाद झाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या संजना संतोष राणे बिनविरोध विजयी झाले आहेत.
वरवडे पंचायत समितीमधून भाजपाचे सोनू सावंत बिनविरोध
पंचायत समिती निवडणुकीत ठाकरे गटाला कणकवली तालुक्यात धक्का बसला आहे. वरवडे पंचायत समितीमधून भाजपाचे सोनू सावंत बिनविरोध आल्या आहेत. ठाकरे गटाच्या सुधीर सावंत व मनसेचे शांताराम साद्ये यांनी माघार घेतली आहे.
हे ही वाचा :
