TRENDING:

अजितदादांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा महापौर, पिंपरी चिंचवडच्या महापौराची आरक्षण सोडत जाहीर

Last Updated:

कधी काळी अजित पवारांचा बालेकिल्ला असलेली पिंपरी चिंचवड महानगर पालिका भाजपनं सलग दुसऱ्यांदा हिसकावून घेतली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक सगळ्यात हायहोल्टेज ठरली होती. कधी काळी अजित पवारांचा बालेकिल्ला असलेली ही महानगर पालिका भाजपनं सलग दुसऱ्यांदा हिसकावून घेतली आहे. महापालिका निवडणूक महायुती स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर होताच अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडलं होतं. त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण त्यांना इथं पराभवाचा सामना करावा लागला.
News18
News18
advertisement

पिंपरी चिंचवडमध्ये १२८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत भाजपनं ८६ जागा जिंकत अजित पवार गटाचा सुफडा साफ केला. आता येथील आरक्षण सोडत जाहीर झालं आहे. पिंपरी चिंचवडची जागा महिला ओपनसाठी राखील सोडण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत सर्वसाधारण गटातील महिला उमेदवारास महापौर पदाचा मान मिळणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या १२८ सदस्यांच्या सभागृहात एकूण ६४ महिला निवडून आल्या आहेत.

advertisement

​पक्षनिहाय महिलांची संख्या

​भाजप: ४२ महिला उमेदवार

​राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): १८ महिला उमेदवार

​शिवसेना (एकनाथ शिंदे गट): ३ महिला उमेदवार

​अपक्ष: १ महिला उमेदवार (शालिनी गुजर)

मोठ्या फरकाने विजयी झालेल्या महिला

भाजपच्या ७ महिला उमेदवारांनी १०,००० पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवला. यामध्ये सारिका गायकवाड (प्रभाग ३) यांनी सर्वाधिक १६,०११ मतांच्या फरकाने विजय मिळवला. इतर प्रमुख विजेत्यांमध्ये स्नेहा कलाटे, रेश्मा भुजबळ आणि श्रुती डोळस यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजप आपला पहिला महापौर सुशिक्षित आणि संघटन कौशल्य या निकषावर कुणाला निवडते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

advertisement

'दादां'चा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
माघी गणेश जयंती! बाप्पाची पूजा कशी करावी? काय आहेत नियम? Video
सर्व पहा

पिंपरी-चिंचवडमध्ये खरी प्रतिष्ठा पणाला लागली होती ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची. त्यांनी स्वतः १५ दिवस या भागात तळ ठोकून मेट्रो आणि मोफत बस सेवेसारखी आश्वासने दिली होती. तरीही, भाजपने ८६ जागा जिंकून 'पिंपरीत दादांऐवजी कमळ' हेच मतदारांच्या मनात असल्याचे दाखवून दिले. येथे राष्ट्रवादी काँग्रेसला ३६ जागा मिळाल्या, परंतु सत्ता स्थापनेसाठी हा आकडा अपुरा ठरला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा महापौर, पिंपरी चिंचवडच्या महापौराची आरक्षण सोडत जाहीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल