जळगाव : जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोपाडा इथं एका गुळनदीच्या पात्रामध्ये एका २२ ते २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. या तरुणाच्या डोक्यावर आणि शरिरावर गंभीर जखमा आहे. त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपड्यात गुळ नदी पात्रात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. एका 22 ते 25 वयोगटातील तरुणाचा मृतदेह गुळ नदीच्या पात्रालगत आढळून आला. स्थानिक गावकरी नदीच्या पात्राजवळ फिरत होते. त्यावेळी चोपडा शहरापासून पूर्व दिशेला नारद गावाजवळ असलेल्या गुळ नदी पात्रातील केटीव्हीअर बंधाऱ्याजवळ 22 ते 25 वयोगटातील युवक मृत अवस्थेत आढळून आला.
advertisement
पोलिसांची घटनास्थळी धाव
स्थानिकांनी घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत तरुणाला मृतदेह हा नदीपात्रातून बाहेर काढला. या तरुणाच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा असल्याचं समोर आलं त्यामुळे वेगवेगळ्या संशयाला उधाण आलं आहे. घटनास्थळी जळगाव ग्रामीण पोलीस दलाचे डीवायएसपी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला.
पोस्टमार्टम रिपोर्टनंतर खुलासा
मृत युवकाला उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यासाठी दाखल करण्यात आलं आहे तर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, अडावद पोलिस स्टेशनचे एपीआय वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी आदिकचा तपास करीत आहे. युवकाच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा असल्यानं पोस्टमार्टम झाल्यानंतरच पुढील तपासाची गती मिळणार असल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितलं. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
