महाराष्ट्रात आता पुन्हा मुसळधार पाऊस करणार कमबॅक, 9 जिल्ह्यांना अलर्ट
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत अनेक सुरक्षा संबंधित अनेक कार्यालय येतात. त्यापैकीच एक म्हणजे, सीमा सुरक्षा दल (Border Security Force) हे आहे. या सुरक्षा संस्थेमध्ये केंद्र सरकारने तरूणांसाठी नोकरीची संधी निर्माण केली आहे. एक हजारांहून अधिक पोस्टसाठी ही भरती केली जाणार असून हेड कॉन्स्टेबल पदासाठी ही मेगा भरतीच केली जात आहे. ऑनलाईन पद्धतीने ही अर्ज प्रक्रिया केली जाणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2025 आहे. या भरतीची सुरूवात 24 ऑगस्ट 2025 पासून झालेली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या गट ‘क’ मधील हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक) पदांसाठी मोठी भरती असल्यामुळे ही भरती संपूर्ण देशभरातून करण्यात येणार आहे.
advertisement
रेशनच्या नावाखाली फसवणूक,हातात बिस्कीट टेकवून दागिने लंपास,संभाजीनगरमधील घटना
या भरतीमध्ये एकूण 1211 पद आहेत. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) या दोन पदासाठी वेगवेगळ्या जागा आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन दरमहा 25,500 ते 81,100 हजार रुपये मिळणार आहे, जे 7 व्या वेतन आयोगानुसार (7th CPC) असेल. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) पदासाठी असलेल्या उमेदवाराचं शिक्षण 12 वी उत्तीर्ण असावं. शिवाय, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये एकूण 60% गुण असणे आवश्यक आहेत. किंवा, 10 वी उत्तीर्ण आणि रेडिओ आणि टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, डेटा प्रिपरेशन आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, जनरल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी किंवा डेटा एंट्री ऑपरेटरमधील ITI असणे आवश्यक आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये मेगाभरती! अर्जाची लिंक बातमीत; जाणून घ्या पात्रता
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) पदासाठी 12 वी उत्तीर्ण आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये एकूण 60% गुण असणे आवश्यक आहेत. किंवा 10 वी उत्तीर्ण आणि रेडिओ आणि टेलिव्हिजन, जनरल इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, डेटा प्रिपरेशन आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, इलेक्ट्रिशियन, फिटर, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स, कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स, कॉम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्क टेक्निशियन, मेकॅट्रॉनिक्स किंवा डेटा एंट्री ऑपरेटरमधील ITI असणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 25 वर्षाची वयोमर्यादा आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 28 वर्षाची वयोमर्यादा आहे. तर, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील उमेदवारांना 18 ते 30 वर्षाची वयोमर्यादा आहे.
तुम्ही कधी 18 व्या शतकातील नोटा आणि नाणी पाहिली का? मुंबईत उभारलाय खास स्टॉल
UR, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला आणि विभागीय व माजी सैनिक उमेदवारांसाठी शुल्क माफ आहे. मात्र, CSC (Common Service Centre) द्वारे अर्ज केल्यास 50 + कर (59) सेवा शुल्क आकारले जाईल. अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाइन असून उमेदवारांनी BSF च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात व्यवस्थित वाचावी. ज्यामध्ये पात्रता, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती दिलेली आहे.