Chhatrapati Sambhajinagar News: रेशनच्या नावाखाली महिलेची फसवणूक, हातात बिस्कीट टेकवून दागिने लंपास, छ. संभाजीनगरमधील घटना
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
महिलांचे मंगळसूत्र गळ्यातून हिसकावून घेणे किंवा खोटे कारण सांगून दागिने काढून घेणे या घटना वाढत आहेत. या सर्व घटना ताज्या असताना परत एका महिलेचे दागिने लंपास केल्याची घटना शहरामध्ये उघडकीस आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरामध्ये सध्या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यातल्या त्यात महिलांचे दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महिलांचे मंगळसूत्र गळ्यातून हिसकावून घेणे किंवा खोटे कारण सांगून दागिने काढून घेणे या घटना वाढत आहेत. या सर्व घटना ताज्या असताना परत एका महिलेचे दागिने लंपास केल्याची घटना शहरामध्ये उघडकीस आली आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील 55 वर्षीय रेखा या एका शाळेमध्ये सफाई कामगार आहेत. 3 सप्टेंबर रोजी त्या घरी परत असताना, शहरातील कामगार चौकात दोन अनोळखी व्यक्तीने त्यांना अडवले. त्यांनी रेखा यांना सांगितले की आमचे मालक रेशन वाटत आहेत. पण ते फक्त गरीब लोक आहेत त्यांनाच रेशन वाटप करत आहेत.
advertisement
तुम्हाला जर हे रेशन घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा असे आरोपींनी रेखा यांना सांगितले. रेशन घेण्यासाठी रेखा यांनी देखील त्यांचे म्हणणे ऐकून आपले दागिने काढले आणि एका रुमालात गुंडाळून ठेवण्यासाठी आरोपीजवळ दिले. रेखा यांच्या हातामध्ये एक पिशवी होती त्या पिशवीमध्ये बिस्कीटचे पुडे आणि एक स्कार्फ होता. त्या आरोपींनी स्कार्फ पिशवीत ठेवण्याचे नाटक केले.
advertisement
थोड्या वेळाने रेखा यांनी पिशवी मधला स्कार्फ बघितला असता तेव्हा त्यामध्ये त्यांना त्यांचे दागिने दिसले नाहीत. आरोपींनी अगदी हातचलाखीने त्यांचे दागिने लंपास केले. जेव्हा रेखा यांच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे आणि दागिने दिसत नाहीयेत तेव्हा त्यांनी पुंडलिकनगर पोलीस स्टेशन गाठत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. सध्या आरोपींचा शोध हा पोलीस घेत आहेत.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 06, 2025 7:27 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhajinagar News: रेशनच्या नावाखाली महिलेची फसवणूक, हातात बिस्कीट टेकवून दागिने लंपास, छ. संभाजीनगरमधील घटना