Vasai Virar Traffic: वसई-विरारची वाहतूक कोंडी सुटणार, वाहतुकीत मोठे बदल, या मार्गांवर प्रवेश बंद!

Last Updated:

Vasai Virar Traffic: मिरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 8 नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

Mumbai Traffic: वसई-विरारची वाहतूक कोंडी सुटणार, वाहतुकीत मोठे बदल, या मार्गांवर प्रवेश बंद!
Mumbai Traffic: वसई-विरारची वाहतूक कोंडी सुटणार, वाहतुकीत मोठे बदल, या मार्गांवर प्रवेश बंद!
विरार: मिरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. तसेच मुंबई अहमदाबाद मार्गावर देखील वाहनांच्या रांगा लागून राहात आहेत. याच पार्श्वभूमीवर वाहकू विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आता शहरांत एक दिशा मार्गिका (वन वे) धोरण राबवण्यात येत आहे. 31 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या काळात वाहतुकीत बदल करण्यात आले असून सर्व वाहनचालकांना नियमांचे पालन करावे लागणार आहे.
वसई-विरार शहरातील वाहतूक सुरुळीत राहावी यासाठी काशीमिरा वाहतूक विभाग परिमंडळ 1 आणि विरार वाहतूक विभाग परिमंडळ – 3 यांच्याकडून शहरात प्रायोगिक तत्वावर एक दिशा मार्गिका धोरण राबवण्यात येत आहे. 31 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान हे धोरण शहरात लागू करण्यात आले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र राज्य पोलीस कायदा कलम 131 आणि मोटार वाहन कायदा कलम 179 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत आयुक्तालयाने माहिती दिलीये.
advertisement
काशिमीराहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बदल
प्रवेश बंद मार्ग:
भक्ति वेदांत हॉस्पिटल से पेणकरपाडा, डालमिया कॉलेज वॉर्निर ते पेणकरपाडा, भोईर सीएनजी पंपासमोरून पांडुरंग वाडी परिसरात प्रवेश बंद राहील.
या मार्गांवरून प्रवेश
पेणकरपाडा रोडवरून दहिसर चेक नाका थेलिस चौकी मार्गे
advertisement
अजित पॅलेस हटिलकडून नॉर्व बाऊंड सर्व्हिस रोडवर उजव्या गळण
लोढा कॉम्प्लेक्स (पांडुरंग वाडी सिग्नलजवळ) येथून महामार्गावर उजव्या वळणासाठी प्रवेश
मिरा गावठाणातील डेल्टा गार्डन बिल्डिंगजवळून महामार्गावर उजव्या वळणासाठी प्रवेश
पर्यायी मार्ग कोणते?
सर्व बंद मार्गावरील वाहने अमर पॅलेस हॉटेल समोरील पुलाखालील वळणावरून यु-टर्न घेऊन मुंबई दिशेने पुढे जातील.
विरारमधील अंतर्गत वाहतुकीतील बद
advertisement
प्रवेश बंद मार्ग
महानगरपालिका कार्यालयासमोरून जाणारा रस्ता वर्तक चौक ते जुने विरार पोलीस ठाणे प्रवेश बंद राहील. तसेच मजेठिया नाका ते टोटाळे तलाव हा वाचनालयाकडे जाणारा मार्गावर देखील 8 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश बंद राहील
पर्यायी मार्ग
मजेठिया नाका व सबवे नाका येथून येणारी वाहने मच्छी मार्केट – बी.के. वर्तक चौकमार्गे बाहेर पडतील. तर टोटाळे तलाव वाचनालय येथून मजेठिया नाका (बस स्टँड समोरून) मार्गे वाहने बाहेर पडतील.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Vasai Virar Traffic: वसई-विरारची वाहतूक कोंडी सुटणार, वाहतुकीत मोठे बदल, या मार्गांवर प्रवेश बंद!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement