Sikandar Shaikh Father : 'माझ्या लेकावर अन्याय करू नका...', सिकंदरला कुणी फसवलं? वडील रशीद शेख यांनी व्यक्त केला संशय, 'हिंद केसरी स्पर्धेत...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sikandar Shaikh Father Statement : माझ्या मुलावर अन्याय करू नका. त्यानं सगळं कष्टानं कमावलेलं आहे. त्याला कुणीतरी फसवलं असणार, असं सिकंदरच्या वडिलांनी म्हटलं आहे.
Sikandar Shaikh Father Statement (प्रितम पंडित, प्रितिनिधी) : महाराष्ट्रातील प्रसिद्ध मल्ल आणि महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी शस्त्रास्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या तिघांकडून आणखी तीन पिस्तुल जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांच्या मते सिंकदर शेख शस्त्र पुरवठा साखळीत मध्यस्थाची भूमिका बजावत होता. अशातच अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटकेत असलेल्या महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांच्या वडिलांची प्रतिक्रिया दिली आहे.
सिकंदरने सगळं कष्टानं कमावलेलं - रशीद शेख
मला पोलिसांनी वा कुणीही माहिती दिली नाही. मला मोबाईलवरून कळालं की सिकंदरला अटक झालीये. सिकंदरने सगळं कष्टाने कमवलंय. सिकंदरशिवाय आमचा कुणीही आधार नाही. सिकंदरवर प्रेम करणारी लोकं लय हायेत. महाराष्ट्र सिकंदरवर प्रेम करतो. त्याच्यासारखा पैलवान पुढं कधीही होणार नाही. पण माझ्या मुलावर अन्याय करू नका. त्यानं सगळं कष्टानं कमावलेलं आहे, असं सिकंदरच्या वडिलांनी म्हटलं आहे.
advertisement
सिकंदरला अडवकण्याचा प्रयत्न - सिकंदरचे वडील
सिकंदरने एक दोन नाही तर शंभरहून अधिक गदा पटकावल्या आहेत. तो आर्मीमध्ये देखील हवलदार म्हणून कामाला आहे. पंजाब पोलिसांना मी कळकळीची विनंती करतो की, सिकंदरने काहीही केलं नाही, त्याला सोडून द्या. सिकंदरला कुणी अडवकण्याचा प्रयत्न करत असेल तर, त्याला देखील माझी विनंती आहे की, त्याला अडकवू नका, तो गरीब पोरगं आहे. त्याच्या वडिलांना शुगर आहे. आईची बीपी वाढली होती, असंही त्याच्या वडिलांनी सांगितलं.
advertisement
सिकंदरच्या दोस्त कंपनीने अन्याय केला
पंजाबमध्ये सिकंदर असं करणार नाही. त्याला कुणीतरी फसवलं असणार आहे. आम्ही गरीब माणसं आहोत. आम्ही हातापाया पडून खाणारी माणसं आहोत. आमच्या धर्मात आम्ही कधी केलं नाही. माझ्या मुलानं जगात नाव केलंय. सिकंदरच्या दोस्त कंपनीने त्याच्यावर अन्याय केला आहे. पंजाबने सिकंदरवर खूप प्रेम केलं आहे. आगामी हिंदकेसरी स्पर्धेत खेळू नये म्हणून सिकंदरला फसवलं गेल्याची शक्यता आहे, असंही रशीद शेख यांनी म्हटलं आहे.
advertisement
सिकंदरला सोडून द्या - रशीद शेख
दरम्यान, पंजाब पोलिसांना माझी विनंती आहे की, सिकंदर शेख यानं काहीही केलं नाही, त्याला सोडून द्यावं. त्याची आई-वडील काळजीत आहे. पोलिसांनी संशय दूर करावा आणि सिकंदरला सोडून द्यावं, असं सिकंदरच्या वडिलांनी म्हटलं आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
November 01, 2025 11:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Sikandar Shaikh Father : 'माझ्या लेकावर अन्याय करू नका...', सिकंदरला कुणी फसवलं? वडील रशीद शेख यांनी व्यक्त केला संशय, 'हिंद केसरी स्पर्धेत...'


