Indian Railway Kinnar : ट्रेनमध्ये किन्नर जबरदस्ती पैसे मागतात, काय करायचं? रेल्वेने दिला उपाय, पुन्हा तुमच्याकडे फिरकणार नाहीत
- Published by:Priya Lad
Last Updated:
Indian Railway Transgender : ट्रेनमध्ये प्रवास करताना ट्रान्सजेंडर लोकांकडून तुम्हाला त्रास दिला जातो का, त्यांच्याकडून पैसे मागितले जातात का? पुढच्या वेळी तुमच्यासोबत असं घडलं तर काळजी करू नका. भारतीय रेल्वेने प्रवाशांना त्यांच्यापासून वाचण्यासाठी एक सोपा मार्ग उपलब्ध करून दिला आहे.
ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्हालाही किन्नरांबाबत असा अनुभव आला असेल, काही किन्नर जबरदस्ती पैसे मागतात, त्रास देतात. अशावेळी काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर भारतीय रेल्वेनेच यावर उपाय सांगितला आहे. किन्नरांनी त्रास दिल्यावर काय करायचं, त्यांच्यापासून बचाव कसा करायचा हे रेल्वेने सांगितलं आहे. (AI Generated Image)
advertisement
उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागातील रेल्वे संरक्षण दल प्रवाशांना त्रास देणं, अनधिकृत प्रवास करणं आणि गाड्यांमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर खंडणी वसूल करणं याविरुद्ध मोहीम राबवत आहे. 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत आग्रा विभागात एक विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 54 जणांना अटक करण्यात आली जे त्यांच्या ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणून ओळखीचा गैरवापर करून अनधिकृतपणे गाड्यांमध्ये प्रवेश करत होते आणि प्रवाशांकडून पैसे मागत होते. (AI Generated Image)
advertisement
जानेवारी ते ऑक्टोबर 2025 दरम्यान, रेल्वे संरक्षण दल आग्रा विभागाने गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश करून प्रवाशांना त्रास देणाऱ्या 303 व्यक्तींविरुद्ध कारवाई केली. याच कालावधीत रेल मदत पोर्टलवर प्रवाशांनी अशा समस्यांबद्दल एकूण 257 तक्रारी दाखल केल्या आणि त्यावर त्वरित कारवाई करण्यात आली. (AI Generated Image)
advertisement
advertisement


