बुलडाणा, 21 ऑगस्ट : काही दिवसांपूर्वी पुण्यात सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी आपल्या पत्नी आणि पुतण्याचा गोळी घालून हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच बुलढाणा जिल्ह्यातही अशीच घटना घडल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने महिला पोलीस कर्माचारी असलेली आपली पत्नी दीड वर्षाच्या मुलीचाही खून केला आहे. या घटनेनंतर त्याने स्वतःही टोकाचं पाऊल उचललं आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात एका माथेफिरु पतीने पोलीस असलेल्या पत्नीला आणि दीड वर्षाच्या चिमुकलीला चाकूने भोकसून दोघींची हत्या करून स्वतःही एका विहिरीत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. किशोर कुटे असं या माथेफिरू पतीचे नाव आहे. त्याची पत्नी वर्षा दंदाले ही चिखली पोलिसात महिला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती. आपली नाईट ड्युटी आटोपून सकाळी आपल्या पंचमुखी हनुमान परिसरातील घरी ती परतली होती.
दुपारी या माथेफिरू पतीने पत्नी आणि दीड वर्षाच्या चिमुकलीवर चाकूने सपासप वार करत दोघींची हत्या केली. त्यानंतर स्वतःही अंढेरा शिवारात एका विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण चिखली शहर हादरून गेले आहे. या धक्कादायक खुनी थरारातून एक आठ वर्षाची मुलगी मात्र बचावली आहे. ती शाळेत गेली असल्याने तिचा जीव वाचला असल्याचं सांगितलं जात आहे. या माथेफिरू किशोर कुटेने त्याची पोलीस असलेली पत्नी आणि दीड वर्षाच्या चिमुकलीला ठार करून स्वतः का आत्महत्या केली याचं कारण अद्याप समोर आलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळी घटनास्थळाचा पंचनामा करून तीनही मृतदेह आपल्या ताब्यात घेतले आहे. पुढील तपासानंतरच या खुनी थरारा मागचं नेमकं कारण कळू शकेल अस पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
पुण्यात काय घडलं होतं?
अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवलं होतं. पुण्यातील बाणेर परिसरात मध्यरात्री 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
वाचा - घरातून पळून चाललेले प्रियकर-प्रेयसी; रस्त्यातच दोघांचा वाद झाला अन् भयानक घडलं
भारत गायकवाड यांना नुकतीच वरिष्ठ पोलीस निरक्षकपदावरुन सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली होती. भारत गायकवाड अमरावती येथे कार्यरत होते. त्यांचे कुटुंब पुण्यात राहत होते. गायकवाड हे अमरावतीवरुन सुट्टी घेऊन पुण्यात आले होते. पहाटे त्यांनी पत्नी मोनी हिला गोळी मारली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांचा पुतण्या दीपक तिथे धावत आला. त्यानंतर गायकवाड यांनी त्यालाही गोळी मारली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.
