advertisement

Crime News: घरातून पळून चाललेले प्रियकर-प्रेयसी; रस्त्यातच दोघांचा वाद झाला अन् घडलं भयानक हत्याकांड

Last Updated:

दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. वाद इतका वाढला की, रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या केली.

प्रियकराने प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या केली
प्रियकराने प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या केली
लखनऊ 21 ऑगस्ट : प्रेमाचं एक हादरवून टाकणारं प्रकरण समोर आलं आहे. यात एका प्रियकराने प्रेयसीवर चाकूने अनेक वार करून तिची हत्या केली. दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. वाद इतका वाढला की, रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या केली. यानंतर प्रेयसीचा मृतदेह महामार्गाच्या कडेला फेकून त्याने पळ काढला. इतकंच नाही तर मग त्यानी स्वतः फोन करून पोलिसांना याची माहिती दिली
ही घटना उत्तर प्रदेशमधील हापूरच्या गढमुक्तेश्वर भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुलबेज असं आरोपीचं नाव आहे. तो रामपूरच्या शहजाद नगरचा रहिवासी आहे. त्याची प्रेयसी मुस्केजहान ही देखील त्याच परिसरातील रहिवासी होती. गेल्या चार-पाच वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.
आता गुलबेज आणि मुस्केजहान दोघेही घरातून पळून नोएडाला जात होते. मात्र मध्येच दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. गढमुक्तेश्वर परिसरातील फुलडी कालव्याजवळ आल्यावर गुलबेज आणि मुस्केजहानमध्ये भांडण सुरू झालं. दरम्यान, गुलबेजने चाकू काढून मस्केजहानवर हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला.
advertisement
गुलबेजने प्रेयसीचा मृतदेह कालव्याजवळ टाकून घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर त्यानी स्वतः 112 वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. सध्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेची माहिती देताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक मुकेश मिश्रा यांनी सांगितलं की, एका तरुणाने 112 वर कॉल करून कळवलं होतं की, त्याने आपल्या प्रेयसीला कालव्याजवळ भोसकून मारलं आहे.
advertisement
माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी करून नंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीच्या सांगण्यावरून तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News: घरातून पळून चाललेले प्रियकर-प्रेयसी; रस्त्यातच दोघांचा वाद झाला अन् घडलं भयानक हत्याकांड
Next Article
advertisement
BMC Mayor : मुंबई महापौरपदाच्या निवडीत ट्विस्ट, भाजपनं सगळा गेम फिरवला, ठाकरेंना पुन्हा धोबीपछाड
मुंबई महापौरपदाच्या निवडीत ट्विस्ट, भाजपनं सगळा गेम फिरवला, ठाकरेंना पुन्हा धोबी
  • मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आला आहे.

  • काठावरचं बहुमत असलेल्या महायुती सरकारनं मोठा डाव टाकला आहे.

  • या डावामुळे ठाकरे गटाच्या रणनीतीवर थेट आघात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

View All
advertisement