हिंगोली : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. प्रचारासाठी अवघे काही तास उरले असताना उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील ड्युटीवर आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदारसंघातील घडामोडी आणि पैशांच्या देवाणघेवाणी चांगलंच लक्ष्य आहे. याचदरम्यान हिंगोली शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
advertisement
हिंगोलीत निवडणुकीआधी पैशाचं घबाड सापडलं आहे. हिंगोली पोलिसांच्यापथकाने 1 कोटीची रोकड जप्त केली आहे. सायन पोलिस आणि मुंबईच्या निवडणूक भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत सायन परिसरातून एका कारमधून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केल्याची माहिती समोर आली आली. पोलिसांनी कारवाई करत ही रक्कम जप्त केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही रक्कम नेमकी कुणाची आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही.
कागदपत्रांची पडताळणी सुरू
समोर आलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरात पोलिसांनी एक कोटी रुपयांची रोकड पकडली आहे. शहरातील मंगळवारा भागातील शेतकरी भवन येथून पोलिसांनी एका चार चाकी गाडीतून ही रक्कम पकडली आहे. रक्कम पकडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ निवडणूक विभागाला ही माहिती दिली. त्यानंतर निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने ही सर्व रक्कम ताब्यात घेत निवडणूक विभागामध्ये आणली आहे. त्यानंतर आता या रकमेच्या संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.
रोकड पोलिसांच्या ताब्यात
हिंगोली परिसरात पोलिसांनी नाकेबंदी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी कारची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये एक कोटी रुपये आढळून आले. पोलिसांनी कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांना या रोकड रक्कमेविषयी समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे ही रोकड पोलिसांच्या ताब्यात घेतली आहे. ही रोकड रक्कम कुठून आणि कशी आली, याबाबत निवडणूक भरारी पथक अधिकारी आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
