TRENDING:

Maharashtra LPG Crisis: राज्यात एलपीजी तुटवडा, मग पर्याय काय? छगन भुजबळांनी विधान परिषदेत सगळंच सांगितलं

Last Updated:

Maharashtra LPG Shortage: राज्यात गॅस टंचाईमुळे रांगा लागल्या आहेत, हॉटेल्स बंद पडत आहेत... पण आता सरकार काय करणार? छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत निवेदन सादर करत शासकीय पातळीवरील उपाययोजनांची माहिती दिली,.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मध्य-पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता सर्वसामान्यांच्या किचनपर्यंत पोहोचला आहे. एलपीजीचा पुरवठा विस्कळीत झाल्याने गॅस एजन्सी बाहेर सामान्य ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. तर, व्यावसायिक एलपीजी सिलिंडर न मिळाल्यानं हॉटेल्सला टाळं लागलं आहे. राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. विरोधकांनी एलपीजी तुटवड्याच्या मुद्यावरून सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत एलपीजीच्या मुद्यावर निवेदन सादर करत भूमिका मांडली.
राज्यात एलपीजी तुटवडा,  मग पर्याय काय? छगन भुजबळांनी विधान परिषदेत सगळंच सांगितलं
राज्यात एलपीजी तुटवडा, मग पर्याय काय? छगन भुजबळांनी विधान परिषदेत सगळंच सांगितलं
advertisement

घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली असून, राज्यातील गॅस पुरवठा आणि टंचाईबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत महत्त्वपूर्ण निवेदन दिले. नागरिकांनी घाबरून न जाता संयम राखावा, सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

सिलिंडरचे नवे दर काय?

आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने केंद्र सरकारने ७ मार्च २०२६ पासून गॅस दरात वाढ केली आहे. घरगुती सिलिंडर ८५२.५० रुपयांवरून आता ९१२.५० रुपये झाला आहे. तर, व्यावसायिक सिलिंडरचे दर १७२०.५० रुपयांवरून आता १८३५ रुपये झाला आहे.

advertisement

काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

गॅस टंचाईचा गैरफायदा घेऊन काळाबाजार करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. भुजबळ यांनी सांगितले की, जिल्हास्तरावर विशेष दक्षता पथके नेमण्यात आली आहेत. १५ मार्चपर्यंत राजभरात २१२९ तपासण्या करण्यात आल्या असून, १२०८ अवैध सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

advertisement

उत्पादनात वाढ आणि पुरवठ्याचे नियोजन

गॅसचा तुटवडा भरून काढण्यासाठी रिफायनरीमधील उत्पादन ९,००० मेट्रिक टनावरून ११,००० मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यात आले आहे. पुरवठ्याबाबत सरकारने प्राधान्यक्रम ठरवला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. रुग्णालये व शैक्षणिक संस्थांना १०० टक्के एलपीजीचा पुरवठा होणार आहे. तर, संरक्षण व रेल्वे या क्षेत्राला ७० टक्के प्राधान्याने पुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

advertisement

एलपीजी तुटवड्यावर पर्याय काय?

एलपीजी अभावी लोकांचे हाल होऊ नये, यासाठी सरकारकडून उपाययोजना आखण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. एलपीजीला पर्यायी इंधन म्हणून केरोसिन वितरण करण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन असल्याचे पत्र मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाला पत्र दिले असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

अफवांवर विश्वास नको...

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात करा लखनऊ कॉटन कुर्ती व्यवसाय, 650 ला करा दादरमध्ये खरेदी, अशी संधी पुन्हा नाही
सर्व पहा

"तेल कंपन्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. तांत्रिक अडचणी दूर करून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस संरक्षण आणि विशेष नियंत्रण कक्ष (Control Room) कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये," असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra LPG Crisis: राज्यात एलपीजी तुटवडा, मग पर्याय काय? छगन भुजबळांनी विधान परिषदेत सगळंच सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल