चंदगड नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. राजर्षी शाहू विकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजप शिवसेना-युतीचे उमेदवार 3 विजयी झाले आहे. राजषी शाहू विकास आघाडीच्या पॅनलने चंदगड नगरपंचायतीवर झेंडा फडकावला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नगरपंचायतीसाठी प्रचाराला आले होते. पण, भाजप शिवसेनेला चंदगडमध्ये सहा ठिकाणी धक्का बसला आहे.
advertisement
चंदगड मध्ये भाजपने कमळ चिन्हावर सगळे पॅनल उभं केलं होतं. आमदार शिवाजीराव पाटील यांनी हे पॅनल उभं केलं होतं. इथं राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली युती झाली. दोन राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना इथं होता.
मुश्रीफ गटाला पुन्हा धक्का
तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये मुरगुड नगरपालिकामध्ये मुश्रीफ गटाला पुन्हा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. प्रभाग क्रमांक पाच अ मधून भाजप शिवसेनेच्या उमेदवारानेच जमादार यांचा पराभव केला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मंडलिक गट सोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक निकाल जाहीर
जयश्री प्रकाश पवार जनसुराज्य नगराध्यक्ष विजयी
20 पैकी सहा बिनविरोध
14 पैकी चार अपक्ष विजयी
16 ठिकाणी जनसुराज्य, भाजपा, स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी
