चंद्रपूर शहरातील जुनोना चौकातील विक्तूबाबा मठ परिसरात बंदुकीचा थरार बघायला मिळाला आहे. संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून सख्ख्या भावाची हत्या करण्यात आली आहे. बुद्धा टाक 45 असे मयताचे नाव असून त्याच्या सख्ख्या भावानेच राहत्या घरी हत्या केली.
गोळ्या झाडून आरोपी भाऊ सोनू टाक फरार झालाय. या घटनेत आणखी एक आरोपी सामील असल्याचा संशय आहे. मयत आणि आरोपी यांच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
advertisement
वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. श्वान पथक, फॉरेन्सिक चमुच्या मदतीने घटनेचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून घटनेचा तपास सुरू केला आहे.
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
Jul 30, 2025 9:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chandrapur: सख्खा भाऊ पक्का वैरी, राहत्या घरी गोळ्या घालून हत्या, आरोपी फरार
