मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, आमच्याही पक्षाच्या सर्व आमदारांना विनंती आहे. त्यांच्याशी मी व्यक्तिगतही बोललो आहे. तपास यंत्रणेच्या तपासात कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही. त्यांच्या विधानामुळे तपास भरकटणार नाही. या पद्धतीचे विधान आमच्याही पक्षाच्या आमदारांनी करू नये आणि त्यांच्याही पक्षाच्या आमदारांनी करू नये, अशा शब्दात बावनकुळे यांनी सुरेस धसांचे कान टोचले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीसांवर विश्वास करावा, सरकारवर विश्वास ठेवाला. या प्रकरणात एकही आरोपी तुम्हाला जेलबाहेर दिसणार नाही, असा शब्द बावनुकळे यांनी दिला आहे.
advertisement
वाल्मिकी कराड आत्मसमर्पणावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, एखादा आरोपी जर शरण येत असेल आणि तपास पुढे जाणार असेल तर त्यावर टीका टिपण्णी करण्यात अर्थ नाही. आतापर्यंत म्हणत होते त्याला पकडत नाही, पकडत नाही, शरण आला तर आता टीका करतात आहे. या प्रकरणातला कोणीही आरोपी सुटणार नाही त्याला योग्य पद्धतीचे पुरावे, चार्जशीट तयार करावी लागतील, गुन्हा दाखल करावा लागतो त्याचप्रमाणे तपास सुद्धा करावा लागतो, आरोपीला शिक्षा होणे तपास असा झाला पाहिजे की आरोपीला शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी सरकारला वेळ द्यावा लागतो पण काहींना टीकाच करायची असते, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
तसेच देवेंद्रजींनी योग्य प्रकारे तपासाचे काम सुरू केलेला आहे गावकऱ्यांनी सरकारवर आमच्यावर विश्वास ठेवावा आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला आहे आम्ही या तपासात कोणालाही सोडणार नाही यासाठी गावकऱ्यांनी साथ द्यावी आणि तपास यंत्रणांना सहकार्य करावे अशी मी विनंती बावनकुळे यांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांना केली.
