TRENDING:

बापाची भेट अधुरीच राहिली, वाटेतच मनस्वीचा दुर्दैवी अंत, संभाजीनगरमधील मन हेलावणारी घटना!

Last Updated:

Accident in Sambhajinagar : वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांना घरचा डबा पोहोचवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये निघालेल्या एका १७ वर्षीय मुलीचा रस्त्यातच मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sambhajinagar : वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांना घरचा डबा पोहोचवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये निघालेल्या एका १७ वर्षीय मुलीचा रस्त्यातच मृत्यू झाला. महापारेषणच्या कामासाठी माती वाहून नेणाऱ्या एका सुसाट हायवाने तिला चिरडलं आहे. ही भीषण घटना हिरापूर शिवारात घडली आहे.
वडिलांना भेटायला चाललेल्या लेकीचा वाटेत अंत
वडिलांना भेटायला चाललेल्या लेकीचा वाटेत अंत
advertisement

नेमकी घटना काय?

मनस्वी गाडगे असं मृत पावलेल्या १७ वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती आपल्या कुटुंबासह हिरापूर येथे वास्तव्यास होती. तिचे वडील सध्या आजारी असून त्यांच्यावर चिकलठाणा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळी मनस्वी आपल्या आईसोबत दुचाकीवरून वडिलांना डबा देण्यासाठी रुग्णालयाकडे निघाली होती. प्रवासादरम्यान हिरापूर परिसरात आल्यावर मनस्वीच्या आईला अचानक चक्कर आली. यामुळे तिने दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली.

advertisement

मात्र, त्याच वेळी नशिबाने घात केला. महापारेषणच्या कामावर असलेल्या एका विनाक्रमांकाच्या हायवा चालकाने मागे न पाहता अचानक रिव्हर्स घेतला. या भीषण धडकेत मनस्वी थेट हायवाच्या चाकाखाली आली. पोटच्या गोळ्याला डोळ्यासमोर मृत्यूच्या दाढेत जाताना पाहून आईने फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

या अपघातानंतर एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या हायवाने मनस्वीला चिरडले, त्यावर कोणताही अधिकृत क्रमांक नव्हता. स्थानिकांच्या दाव्यानुसार, अपघात घडल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी हायवावरील जुना क्रमांकही पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. गंभीर जखमी मनस्वीला उपचारासाठी ११ किमी अंतरावरील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिची प्राणज्योत मालवली.

advertisement

ग्रामस्थांचा संताप आणि पोलिसांत गुन्हा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाला मिळेना योग्य भाव, शेतकऱ्याने केला भारी प्रयोग, आता 9 लाख रुपयांचा नफा
सर्व पहा

मनस्वीच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच हिरापूरवासीयांनी आणि नातेवाईकांनी चिकलठाणा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. "जोपर्यंत महापारेषणचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही," अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली. सुमारे तीन तास चाललेल्या या आंदोलनानंतर पोलिसांनी हायवा चालक, महापारेषण आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला. हेड कॉन्स्टेबल सुनील सुरसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
बापाची भेट अधुरीच राहिली, वाटेतच मनस्वीचा दुर्दैवी अंत, संभाजीनगरमधील मन हेलावणारी घटना!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल