सागर भोसले यांनी पारंपरिक द्राक्ष विक्रीऐवजी बेदाणा उत्पादनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते बेदाणा तयार करत असून त्यातून चांगला आर्थिक फायदा मिळवत आहेत. त्यांनी एका एकरात थॉमसन जातीची द्राक्ष लागवड केली. पिकावर रोग येऊ नये यासाठी योग्य वेळी फवारणी करून त्यांनी दर्जेदार उत्पादन घेतले.
Success Story : 30 हजार खर्च अन् दीड लाख नफा, तरुण शेतकऱ्याचा प्रयोग भारीच, असं काय केलं?
advertisement
सुमारे 150 दिवसांत द्राक्ष तयार झाल्यानंतर त्याची तोडणी करून शेडमध्ये वाळवण्यासाठी ठेवले जाते. 13 ते 15 दिवसांच्या प्रक्रियेनंतर तयार झालेला बेदाणा कोल्ड स्टोरेजमध्ये साठवला जातो. त्यानंतर सोलापूर आणि पंढरपूर बाजारात त्याची विक्री केली जाते.
द्राक्ष लागवड ते बेदाणा उत्पादन या संपूर्ण प्रक्रियेस सुमारे 3 लाख रुपये खर्च येतो. मात्र सर्व खर्च वजा करून सागर भोसले यांना एका एकरातून सुमारे 8 ते 9 लाख रुपयांचा नफा मिळत आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा पर्याय उपलब्ध झाला असून, कमी दराच्या संकटावर मात करण्याचा मार्ग खुला झाला आहे.





