TRENDING:

ग्रीन टीपेक्षाही लाभदायक ठरतो हा निळा चहा; जाणून घ्या, नेमके काय फायदे होतात?, VIDEO

Last Updated:

blue tea benefits - हा ब्ल्यू टी घेण्याचे अनेक असे फायदे आहेत. ते नेमके कोणते, तेच आपण जाणून घेणार आहोत. या चहाचे काय फायदे होतात याविषयी आहारतज्ञ अलका कर्णिक यांनी महत्त्वाची माहिती दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
advertisement

छत्रपती संभाजीनगर : आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होते. कोणी दुधाचा चहा घेतात किंवा कोणी काळा चहा घेतात. तर काहीजण ग्रीन टी घेतात. पण या सर्व चहापेक्षा अत्यंत फायदेशीर असा ठरतो तो म्हणजे निळा चहा. त्याला ब्ल्यू टी म्हटले जाते. हा ब्ल्यू टी घेण्याचे अनेक असे फायदे आहेत. ते नेमके कोणते, तेच आपण जाणून घेणार आहोत. या चहाचे काय फायदे होतात याविषयी आहारतज्ञ अलका कर्णिक यांनी महत्त्वाची माहिती दिली.

advertisement

लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, ब्ल्यू टी म्हणजेच निळा चहा. हा गोखरणाच्या फुलापासून बनतो. त्याला अपराजिता देखील म्हणतात. हा निळा चहा पिणे आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगले असते. पण विशेष करून आपला मेंदूसाठी अत्यंत फायदेशीर असा हा चहा आहे. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी आपल्याला मेंदू चांगला ठेवण्यासाठी आणि इतरही गोष्टींसाठी हा चहा घेत होते. आपल्या चहामध्ये कॅफिन असते त्यापेक्षा अत्यंत पोषक घटक या निळ्या चहामध्ये असतात.

advertisement

अनेक आयुर्वेदातील औषधांमध्ये याचा वापरही केला जातो. हा चहा घेताना तुम्ही शरीरामध्ये कुठले तरी अन्नघटक घ्यायला हवे, त्यानंतरच चहा घ्यायला हवा किवा तुम्ही दुपारचे जेवण घेतल्यानंतर दोन ते अडीच तासांनी हा जर चहा घेतला तर याचा जास्त फायदा आणि जास्त घटक हे आपल्या शरीराला मिळतात. ज्यांना लवकर थकवा जाणवतो अशांसाठी हा चहा अत्यंत लाभदायी ठरतो.

advertisement

भारतातील पहिलेवहिले 'वाईल्ड लाईफ म्युझिकल प्ले', काय आहे यात असं खास?

हा चहा घेताना मात्र तुम्ही योग्य प्रमाणातच घेणे गरजेचे आहे. याचा जर तुम्ही अतिरेक केला तर याचे दुष्परिणाम देखील तुमच्या शरीरावरती होऊ शकतात. दयरोग असेल,मधुमेह असेल, ऍसिडिटी असेल किंवा ओबीसीटी असेल अशा सर्व आजारांवर हा चहा अत्यंत गुणकारी ठरतो. पण याचेप्रमाण तुम्ही ठरवून घ्यायला हवे, असे आहारतज्ञ अलका कर्णिक यांनी सांगितले.

advertisement

सूचना : या बातमीत दिलेली माहिती ही तज्ञांशी झालेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच फॉलो करावी. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
ग्रीन टीपेक्षाही लाभदायक ठरतो हा निळा चहा; जाणून घ्या, नेमके काय फायदे होतात?, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल