मंदा परमेश्वर सुरडकर (38) सून आणि तिच्या सहकाऱ्यांविरोधात पोलिसांत धाव घेतली. मंदा यांना दोन मुले असून एकाचे लग्न झाले आहे. तो पत्नीसह वेगळा राहतो. तर मंदा पती आणि लहान मुलासह दुसऱ्या घरात राहतात. सुनेच्या प्रसूतीनंतर मुलगा अधूनमधून घरी येत होता. 17 मार्च रोजी सून कोमल ही आई उमा घोरपडे आणि बहीण पायल जावळे यांच्यासह घरी आली. तसेच घरासमोर उभं राहून शिवीगाळ सुरू केली.
advertisement
आजारी वडिलांना डबा द्यायला निघाली, मनस्वीसोबत भयंकर घडलं, छ. संभाजीनगर हळहळलं
सून शिवीगाळ करत असताना मंदा या पती आणि मुलासह घरात होत्या. खाली येण्यास सांगितल्यानंतर मंदा व मुलगा घरातून खाली आले. तेव्हा तिघींनी लग्नाच्या खर्चावरून मारहाण सुरू केली. तसेच शिवीगाळ करत हातानेच मारायला सुरुवात केली.
खोट्या गुन्ह्याची धमकी
मंदा यांचा मुलगा करण आणि सून कोमल यांचा प्रेमविवाह आहे. लग्नामध्ये झालेल्या खर्चाची मागणी वारंवार होत होती. त्यामुळे हा वाद वाढला. सूनेने मारलेल्या ठोशामुळे सासूचा दात पडला. तर सूनेने मुलावर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
