TRENDING:

हनीट्रॅप अन् ब्लॅकमेलिंग, प्राध्यापक लोंढे हत्या प्रकरणाला नवं वळण, तपासात मोठा खुलासा समोर

Last Updated:

निवृत्त प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: निवृत्त प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. केवळ वैयक्तिक वाद नाही, तर या हत्येमागे ५० लाखांची देवाण-घेवाण, एक मोठे 'हनी ट्रॅप' रॅकेट आणि ब्लॅकमेलिंगचं जाळं असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.
News18
News18
advertisement

मुख्य आरोपीचा पोलिसांना महिनाभर चकवा

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वि विशाल राठोड हा अत्यंत सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. त्याच्यावर यापूर्वी लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल झाली होती. मात्र त्याने पैसे देऊन हे प्रकरण दाबल्याचं बोललं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लोंढे यांची हत्या केल्यानंतरही विशाल हा त्यांच्या नातेवाइकांसोबतच पोलीस ठाण्यात वावरत होता. "मी दोन दिवसांत त्यांना शोधून आणतो," अशी थाप मारून तो महिनाभर पोलीस आणि कुटुंबियांना गुंगारा देत होता.

advertisement

'रीलस्टार' महिला आणि राजकीय कनेक्शन

पोलिसांनी या प्रकरणात खोलात जाऊन तपास केला असता यात हनी ट्रॅप रॅकेट आणि ब्लॅकमेलिंग झाल्याची माहिती समोर येत आहे. यात गेवराई तांडा परिसरात सक्रिय असलेल्या एका मोठ्या रॅकेटचा सहभाग असावा. तसेच हर्सूलमधील काही तरुण आणि एका ब्युटी पार्लर चालक महिलेच्या माध्यमातून प्राध्यापक लोंढे यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आलं होतं, असा संशय आहे. विशेष म्हणजे ज्या महिलेवर संशय आहे, संबंधित महिला ही सोशल मीडियावर 'रीलस्टार' म्हणून प्रसिद्ध असून, तिचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे व्हिडिओ चर्चेत आले आहेत. तसेच लोंढे यांचे वैयक्तिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन या टोळीने त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची चर्चा आहे.

advertisement

पोलीस निरीक्षकावर कारवाईची मागणी

उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताटे यांनी दीड महिना तक्रारीकडे दुर्लक्ष केले, असा गंभीर आरोप लोंढे यांचे बंधू उत्तम लोंढे यांनी केला आहे. या संतापामुळे नातेवाइकांनी सुरुवातीला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. जोपर्यंत कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मध्यस्थीनंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

याशिवाय या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल राठोड हा पुण्यातील काही गुन्हेगारी टोळ्यांच्या संपर्कात होता. त्याने आपल्या गावात 'लाला' नावाच्या मराठी चित्रपटाचं शूटिंगही केलं होतं. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले की, "आरोपींनी सुरुवातीला खोटे जबाब देऊन दिशाभूल केली असली, तरी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस हत्येच्या मुळापर्यंत पोहोचतील."

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
हनीट्रॅप अन् ब्लॅकमेलिंग, प्राध्यापक लोंढे हत्या प्रकरणाला नवं वळण, तपासात मोठा खुलासा समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल