सैय्यद फैजल उर्फ तेजा असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तेजा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या खूनाचा प्रयत्न, बलात्कार, चोरी आणि अमली पदार्थ तस्करी संदर्भात विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी तेजा हा सोमवारी रात्री उशिरा आपल्या मैत्रिणीला भेटायला गेला होता. यावेळी त्याने मैत्रिणीवर गोळीबार केला. यातील एक गोळी मैत्रिणीच्या हाताला लागली आहे. दैव बलवत्तर म्हणून तरुणी थोडक्यात बचावली आहे.
advertisement
पुढे आलेल्या माहितीनुसार, ही घटना शहरातील किलेअर्क परिसरात रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. राखी मुरमरे असं 22 वर्षीय जखमी मैत्रिणीचे नाव आहे. सध्या तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून हा हल्ला नेमका कुठल्या कारणावरून झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दाखल घेत अधिक तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कोण आहे सराईत तेजा?
तेजा हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरी, बलात्कार, खुनाचा प्रयत्न आणि अमली पदार्थांची तस्करी प्रकरणातील अनेक गुन्हे दाखल आहेत. तेजा हा सुरुवातीला भुरटा चोर होता. तो लहान मोठ्या चोऱ्या करायचा. मात्र नंतर तो काही सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात आला आणि तोही सराईत बनला. २०२१ मध्ये एका अल्पवयीन मैत्रिणीने तेजावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल केला होता. त्याने चाकुने तिला भोसकल्याची देखील नोंद आहे. याशिवाय त्याने संभाजीनगरमध्ये एका रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला देखील केला होता. याच सराईत गुंडाने आता आपल्या मैत्रिणीवर गोळीबार केला आहे.
