छत्रपती संभाजीनगर : भारताला विविध परंपरा आणि संस्कृतीचा वारसा लाभला आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र आनंदाने या सर्व परंपरा पाळल्या जातात. सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रोत्सवानंतर विजयादशमी म्हणजे दसरा सण साजरा केला जातो. या दिवशी आपट्याची एकमेकांना सोनं म्हणून भेट दिली जातात. तर या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना का भेट दिली जातात, तसेच ही परंपरा नेमकी कशी सुरू झाली, त्यामागे काय आख्यायिका आहे याविषयी आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील गुरुजी श्रीरामजी धानोरकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, शारदीला नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण सर्वजण घटस्थापना करतो. अगदी मनोभावे देवीची पूजा करतो आणि दहाव्या दिवशी आपण सर्वजण विजयादशमी म्हणजेच दसरा सण साजरा करतो.
या दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना आपट्याची पाने देत असतो. ही आपट्याची पाने आपण सोने म्हणून देत असतो. या मागे एक आख्यायिका आहे. ती आख्यायिका अशी की, प्रभू श्री रामचंद्रांचे पूर्वज रघु राजा यांनी खूप मोठा यज्ञ केला होता. या यज्ञामध्ये त्यांना सर्वस्व दान करून टाकले होते. त्यांनी यामध्ये स्वतःचे सुवर्ण अलंकार त्यासोबतच घरातील सर्व अन्न शिजवण्याचे भांडेदेखील दान केले होते.
हे सर्व दान केल्यानंतर त्यांनी कुंभाराकडून मातीचे भांडे घेतले आणि त्यामध्ये ते अन्न शिजवू लागले. एके दिवशी वरतंतू ऋषींच्या शिष्यांपैकी एक कौस्त्य नावाचे शिष्य हा रघु राजाकडे आले. ते 14 विद्या शिकले होते. त्यांना 14 हजार मुद्र हव्या होत्या. त्यासाठी ते रघु राजा यांच्याकडे आले होते. यावेळी रघु राजा यांच्याकडे एवढ्या सुवर्ण मुद्रा नव्हत्या. त्यांनी असं ठरवलं की. आपण कुबेर यांच्याकडे चोरी करून या मुद्रा घ्यायचा.
ही गोष्ट कुबेर यांना माहिती पडली. यावेळी कुबेरांनी रघु राजा यांच्या अंगणामध्ये सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला आणि त्यांना पत्र लिहिले की, हे सर्व तुमच्यासाठी आहे. रघु राजा यांनी कौस्त्य यांना बोलावले आणि म्हणाले या सर्व मुद्रा तुमच्यासाठी आहे. पण कौस्त्य यांनी फक्त 14 हजार मुद्रा घेतला आणि ते रघु राजा यांचे आभार मानून निघून गेले.
उरलेल्या बाकीचा मुद्रांचे रघु राजा यांनी जनतेला सांगतीले की, तुम्हाला जेवढी गरज असेल तेवढ्या या मुद्रा घेऊन जा आणि जनताही लागतील तेवढ्या मुद्रा घेऊन गेली. या मुद्रा ज्या ठिकाणी होत्या ते ठिकाण म्हणजे आपट्याचे झाड होते. त्याखालीच या सर्व मुद्रा होत्या आणि त्या दिवशी पासून दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे सोने म्हणून त्याची परंपरा सुरू झाली, अशी आख्यायिका असल्याचे धानोरकर गुरुजी लोकल18 शी बोलताना म्हणाले.
सूचना - ही माहिती ज्योतिषी, आचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.