छत्रपती संभाजीनगर : आता लवकरच नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्यापैकी अनेक जण देवीचा उपास करतात. पण उपवास म्हटल्यावर साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे किंवा भगर तयार केली जाते. मात्र, यापेक्षा तुम्ही वेगळाही एक पदार्थ तयार करू शकता. त्याला उपवासाचे चाट असे म्हणतात. ही रेसिपी अगदी झटपट अशी रेसिपी तयार होते. डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी याबाबतची रेसिपी सांगितली.
advertisement
चाट तयार करण्यासाठी लागलेले साहित्य -
दोन बटाटे, दोन रताळ, उपवासासाठी चालणारे कोणतेही पीठ, हिरवी चटणी, गोड लाल चटणी, दही, उपवासाचा चिवडा, ड्राय फ्रुट्स
कृती - सर्वप्रथम बटाटे आणि रताळे उकडून घ्यावे. त्यानंतर त्यांचे साल काढून ते बारीक करून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याकडे जे कोणतेही उपवासासाठी चालणारे पीठ असेल ते पीठ चार चमचे घालावे आणि त्याचा गोळा मळून घ्यावा. त्यानंतर पारी करायची. पारी करणे म्हणजे पोळी करण्यापूर्वी गोल चपाती लाटली जाते. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आणि ते 10 ते 15 मिनिटे तव्यावरती फ्राय करून घ्यायचे. त्यासाठी थोडे तूप देखील वापरावे.
Sindhudurg News : परतीच्या पावसाचा भातशेतीला मोठा फटका, पिकं जमिनीदोस्त; डोळ्यात अश्रू आणणारी दृश्य
हिरवी चटणी तयार करण्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ टाकून ते सर्व मिक्सरमधून काढून घ्यावे आणि त्यावर लिंबू पिळून झाल्यावर ही हिरवी चटणी तयार होते. तर गोड चटणी तयार करण्यासाठी आमचूर पावडर पाण्यात मिक्स करावे. त्यामध्ये थोडासा गूळ घालावा आणि हे मिश्रण शिजवून घ्यावे. शिजवून झाल्यानंतर त्याला फोडणी घालावी. त्यानंतर त्यामध्ये तूप आणि थोडेसे जिरे घालून आणि तिखट घालावे आणि हे मिश्रण गरम करून घ्यावे. अशाप्रकारे लाल, गोड चटणी तयार होते. दही हे फेटून घ्यावे, यानंतर मीठ आणि साखर घालावे आणि हे दही तयार होते.
एका डिशमध्ये टिक्की घ्यावे. त्यावर प्रथम गोड चटणी टाकावे. नंतर हिरवी चटणी टाकावी. त्यानंतर वरुन दही टाकावे आणि परत हिरवी आणि गोड चटणी टाकावी आणि सर्वात शेवटी उपवासाचा चिवडा टाकावा. अशाप्रकारे हे उपवासाचे चाट तयार होते. नवरात्रीत तुम्ही हे उपवासाचे चाट एकदा नक्की ट्राय करू शकता. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल.