मैत्री, धर्मांतर आणि मग नरकयातना
पीडितेच्या फिर्यादीनुसार, आरोपी पतीने सुरुवातीला गोड बोलून मैत्री केली आणि नंतर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिचे धर्मांतर करून मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावले. मात्र, लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यातच पतीचा खरा चेहरा समोर आला. त्याने अनेक परक्या पुरुषांना घरी आणून पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडले. यापूर्वीही पीडितेने छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे दाखल केले होते, मात्र आरोपीच्या जाचातून तिची सुटका झाली नाही.
advertisement
परभणीत सामूहिक बलात्कार अन् चाकूने हल्ला
२०२४ मध्ये आईच्या मृत्यूनंतर आरोपीने पुन्हा पीडितेशी जवळीक साधली आणि तिला परभणीला नेले. तिथे दिराने तिची छेड काढली आणि तक्रार केल्यावर सासू-सासऱ्यांनी तिला बेदम मारहाण केली. ७ जानेवारी २०२६ आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये परभणीतील घरातच ४ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. "परभणी आमची आहे, आता तुला मजा येते का?" असे म्हणत नराधमांनी तिच्या मांडीवर चाकूने वार करून तिला रक्तबंबाळ केले. या भीषण छळात एका मौलानानेही तिची छेड काढल्याचा आरोप तिने केला आहे.
घरात शिरून मारहाण अन् सोन्याची चोरी
२० फेब्रुवारी रोजी आरोपी पतीने छत्रपती संभाजीनगरमधील घरात शिरून पीडितेला आणि तिच्या चिमुकल्या मुलाला लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. जाताना त्याने घरातील ५ ते ६ तोळे सोने आणि वडिलांची मोपेडही चोरून नेली. अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेने ११२ वर कॉल केला आणि पोलिसांकडे न्याय मागितला.
१० जणांविरुद्ध गुन्हा
नानलपेठ पोलिसांनी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये बलात्कार (६४-१), सामूहिक बलात्कार (७०-१), अश्लील चित्रफित दाखवणे (७५-२), जीवे मारण्याची धमकी आणि तीक्ष्ण हत्याराने मारहाण अशा गंभीर कलमांचा समावेश आहे. एकूण १० जणांवर गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
