छत्रपती संभाजीनगर : सध्याचे जग हे डिजिटल जग आहे. या डिजिटल युगामध्ये आत्ताची तरुण पिढी किंवा लहान मुलं आहेत हे पूर्णपणे डिजिटल माध्यमांच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. यामुळेच सध्या लहान मुलांमध्ये स्वमग्नतेचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. त्यांच्यासाठी ही एक अत्यंत घातक गोष्ट आहे. त्यामुळे अशावेळी पालकांनी काय करावे, नेमकं काय उपाययोजना कराव्यात, याविषयी लोकल18 च्या टीमने मानसोपचारतज्ज्ञ मधुरा अन्वीकर यांच्याशी विशेष संवाद साधला.
advertisement
लोकल18 शी बोलताना मानसोपचारतज्ज्ञ मधुरा अन्वीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली. कोरोना काळानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मुलांमध्ये स्वमग्नतेचे प्रमाण वाढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, अगदी लहान वयापासूनच मुले ही मोबाईलच्या आहारी जात आहेत किंवा त्यांना मोबाईल हा दिलाला गेला आहे. अगदी लहान वयापासूनच आई-वडील मुलांना मोबाईल देत असतात, त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाइमिंग जास्त वाढलेला आहे. त्यामुळे देखील मुले ही स्वमग्नतेचे प्रमाण वाढलेला आहे. कोरोनापूर्वी हे प्रमाण कमी होते. मात्र, सध्या शंभरामागे 10 ते 12 मुले याच्या आहारी गेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
स्वमग्नता ही अनुवंशिकता देखील असू शकते किंवा जन्मताच असू शकते. पण सध्या मोबाईलमुळे किंवा स्क्रीन टायमिंगमुळे याचे प्रमाण जास्त वाढले आहे. अशावेळी पालकांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे त्यासोबतच त्यांना जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळण्याकडे भर द्यावा. त्यांच्या अभ्यासाकडे स्वतः लक्ष द्यावे. तसेच ज्या गरोदर महिला आहेत, त्यांची व्यवस्थितरित्या काळजी घ्यावी.
जर त्यांची काळजी घेतली तर होणाऱ्या बाळाला कुठलाही त्रास किंवा कुठलाही आजार होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. अशा पद्धतीने जर पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेतली, त्यांच्यावर व्यवस्थितरित्या लक्ष दिले तर यामुळे तुमची मुले व्यवस्थित राहतील, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
सूचना - वर दिलेली माहिती ही आरोग्यतज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.