आता छत्रपती संभाजीनगरमधूनही एक अशीच घटना समोर आली आहे. यात संभाजीनगरमधील एक रील व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये हातात रिव्हॉल्व्हर घेऊन एका टोळक्याने सिनेस्टाईल रील बनवल्याचं पाहायला मिळतं. ही रील माळीवाडा परिसरातील समृद्धी महामार्गावर तयार करण्यात आली असून सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
advertisement
समाज माध्यमांवर पोस्ट केलेल्याया रीलची चर्चा आणि रील पोलिसांपर्यंत पोहचली. मग काय पोलिसांनीही लगेचच कारवाई करत जिंसी भागातील पाच तरुणांना ताब्यात घेतलं आहे. इतरर दोन जण दोन रिव्हॉल्व्हरसह फरार झाले आहेत. आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे..रीलमध्ये दिसणाऱ्या रिव्हॉल्व्हर खऱ्या आहेत का? मग त्या कुठून आणल्या आणि आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारांची आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.
जोडप्याची पुलावरुन उडी -
रील्ससंदर्भातील आणखी एक घटना नुकतीच समोर आली होती. यात राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील मिनी काश्मीर म्हणवला जाणारा गोरामघाट एका दाम्पत्यासाठी अतिशय धोकादायक ठरला. रेल्वे ट्रॅकवर रील बनवत असलेल्या पती-पत्नीने अचानक समोरून ट्रेन आल्याचं पाहिलं. हे पाहून ते घाबरे आणि जीव वाचवण्यासाठी खोल खड्ड्यात उडी घेतली. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. प्रकृती गंभीर असल्याने पती राहुलला सोजत येथून जोधपूरला रेफर करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक रुग्णालयात पोहोचले.