केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत बळीराम लहाने यांच्या शेतात जीके सोलर कंपनीमार्फत सौर पंप बसवण्यात आला. यापूर्वी वीज नसल्याने किंवा वीज खंडित होण्यामुळे रात्री-अपरात्री पाण्यासाठी धावपळ करावी लागायची. आता सौर ऊर्जेवर दिवसा सहज पाणी मिळते. त्यामुळे शेतीचे काम नियोजित, सुरक्षित आणि कार्यक्षम झाले आहे, असं बळीराम लहाने यांनी सांगितले.
advertisement
सौरपंप बसविल्याने वीज बिलात मोठी बचत, पाण्याचा कार्यक्षम वापर, उत्पादनात वाढ आणि पर्यावरणस्नेही शेतीकडे वाटचाल असे फायदे त्यांना झाले आहेत. हे निमंत्रण केवळ बळीराम लहाने यांचे वैयक्तिक यश नाही, तर कुसुम सोलर योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचे ठळक उदाहरण आहे. धांडेगावासारख्या छोट्या गावातील एका शेतकऱ्याला राष्ट्रपती भवनात उपस्थित राहण्याचा मान मिळणे हे संपूर्ण जालना जिल्हा आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.
या यशोगाथेने अनेक शेतकऱ्यांना सौर ऊर्जा योजना स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि ग्रामीण भागात शाश्वत शेतीची नवी दिशा उघडेल.





