फिरायला जायचं सांगितलं, आळंदीत नेलं अन् पाहुण्यांच्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Jalna News: आळंदीत नेऊन बळजबरीने एका मंदिरात मुलीचे लग्न लावून घेतले. या लग्नाचे प्रमाणपत्रही संस्थेकडून घेण्यात आले आहे.
जालनाः अलिकडे विवाहासाठी मुली न मिळणं ही मोठी सामाजिक समस्या बनली आहे. अशातच जालन्यातून एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अंबड तालुक्यातील एका गावातील चौघेजण नात्यातील एका मुलीला फिरायला म्हणून घेऊन गेले आणि थेट आळंदीला नेऊन लग्नच करून आले. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार मुलीच्या इच्छेविरोधात झाला असून याप्रकरणी मुलीने गोंदी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.
नेमकं घडलं काय?
अंबड तालुक्यातील एका गावातून फिरायला जायचे म्हणून नात्यातील मुलीला कारमधून सोबत नेले. यानंतर मुलीला आळंदी येथील एका मंदिरात नेण्यात आले. मुलीची इच्छा नसतानाही मुलीला 'लग्न कर, नसता तुला जिवंत मारून टाकू,' अशी धमकी देत बळजबरीने लग्न लावून घेतले. दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर मुलीने आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. यानंतर मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अंबड तालुक्यातील एका गावात घडली.
advertisement
या प्रकरणात मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून महेश राजेंद्र काकडे, सोनू राजेंद्र काकडे यांच्यासह दोन महिला अशा चार जणांविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ज्ञानेश्वर कंटुले हे करीत आहेत.
दरम्यान, नातेवाईक मुलीला घेऊन गेल्याची माहिती कळाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी 'मुलीचा होकार असेल तर लग्न लावून देतो,' असे सांगितले. परंतु, त्याआधीच आळंदी येथे मुलीचा विवाह करून घेतला आहे. ही संपूर्ण घटना 21 जानेवारी रोजी घडली.
advertisement
बसस्थानकातून मुलीला कारमध्ये बसवले
मुलगी ही गेवराई येथे कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. ती 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शहागड येथील बसस्थानकात आली होती. याप्रसंगी नातेवाइकांनी तिला त्याच ठिकाणाहून 'आपल्याला फिरायला जायचे आहे' म्हणत कारमध्ये बसवून घेतले. यानंतर आळंदीत नेऊन बळजबरीने एका मंदिरात मुलीचे लग्न लावून घेतले. या लग्नाचे प्रमाणपत्रही संस्थेकडून घेण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 10:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
फिरायला जायचं सांगितलं, आळंदीत नेलं अन् पाहुण्यांच्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार






