बारसमोर थांबला होता तरुण, अचानक 4 राऊंड फायर; जागीच मृत्यू, जालन्यातील धक्कादायक घटना
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
. आरोपींकडून 4 राऊंड फायर केल्यामुळे संबंधित तरुणाचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
जालना : जालना शहरात धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात एका तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. आरोपींकडून 4 राऊंड फायर केल्यामुळे संबंधित तरुणाचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
चरण रायमल असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. घाटी परिसरातील एका बारसमोर किरण थांबला होता. व्यवसायाने तो वाहनचालक आहे. दबा धरून बसलेल्या तीन ते चार जणांनी त्याच्यावर हल्ला केला. रात्री ८:३० वाजता अज्ञात हल्लेखोरांनी देशी पिस्तूलने ताबडतोब गोळीबार केला.
advertisement
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आणि संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. माहितीनुसार, जिल्हा रुग्णालय रोडवरील एका हॉटेलसमोर अचानक गोळीबार झाला, ज्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी, कदीम जालना पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची घेराबंदी करून तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आले असून, आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी सुरू आहे.
advertisement
सध्या गोळीबाराचे कारण आणि हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 10:56 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
बारसमोर थांबला होता तरुण, अचानक 4 राऊंड फायर; जागीच मृत्यू, जालन्यातील धक्कादायक घटना









